25.2 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeलातूर१६०४ बालकांना प्रवेशाची लॉटरी

१६०४ बालकांना प्रवेशाची लॉटरी

एकमत ऑनलाईन

लातूर : आरटीईतंर्गत पालकांच्या पाल्यांना पहिलीच्या वर्गासाठी २५ टक्के मोफत प्रवेशासाठी दि. ३१ मार्च अखेर लातूर जिल्हयातील १ हजार ७४० जागेसाठी ४ हजार २४ ऑनलाईन अर्जांची नोंदणी झाली होती. इयत्ता पहिलीच्या वर्गासाठी प्रवेश देण्यासाठी राज्यस्तरावरून ऑनलाईन पध्दतीने बुधवार दि. ७ एप्रिल रोजी १ हजार ६०४ बालकांना मोफत प्रवेशाची लॉटरी लागली आहे.

अनुसुचित जाती, अनुसूचित जमाती व अपंग प्रवर्गातील लाभार्थ्यांना तसेच इतर संवर्गातील ज्या पालकांचे वार्षिंक उत्पन्न १ लाखापेक्षा कमी आहे, अशा पालकांच्या पाल्यांना पहिलीच्या वर्गासाठी २५ टक्के (आरटीई) मोफत प्रवेशसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रीया दि. ३ मार्च पासून सुरू झाली होती. लातूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडे नोंदणी झालेल्या २३८ शाळांनी २५ टक्के मोफत प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे. या नोंदणी झालेल्या २३८ शाळेतील इयत्ता पहिलीच्या वर्गातील १ हजार ७४० जागेच्यासाठी ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी दि. २१ मार्च हा शेवटचा दिवस होता. शासनाने या तारखेला मुदतवाढ दिल्याने पालकांना दि. ३१ मार्च पर्यंत प्रवेशासाठी पोर्टलवर नोंदणी करण्याची संधी दिली होती. त्यानुसार पालकांनी इयत्ता पहिलीच्या वर्गाच्या मोफत प्रवेशासाठी ४ हजार २४ ऑनलाईन अर्जांची नोंदणी केली.

इयत्ता पहिलीच्या वर्गासाठी मोफत प्रवेश देण्यासाठी राज्यस्तरावरून ऑनलाईन पध्दतीने बुधवार दि. ७ एप्रिल रोजी मोफत प्रवेशाची लॉटरी काढण्यात आली. यात लातूर जिल्हयातील १ हजार ६०४ बालकांना इयत्ता पहिलीच्या वर्गासाठी निवड झाली आहे. यात लातूर तालुक्यातील ९४५ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. अहमदपूर तालुक्यातील ९७ बालके, चाकूर तालुक्यातील ६८ बालके, देवणी तालुक्यातील ३४ बालके, जळकोट तालुक्यातील ५ बालके, निलंगा तालुक्यातील १३५ बालके, रेणापूर तालुक्यातील २७, शिरूर अनंतपाळ तालुक्यातील १२ बालके, तर उदगीर तालुक्यातील २०५ बालकांचा इयत्ता पहिलीच्या वर्गाच्यासाठी मोफत प्रवेशाची लॉटरी लागली आहे.

पालकांनी एसएमएसवर अवलंबून राहू नये
आर.टी.ई. प्रवेश प्रक्रिया २०२१-२२ या वर्षाकरिता लॉटरी द्वारे पात्र विद्यार्थ्यांच्या पालकांना दि. १५ एप्रिल पासून एमएमएस प्राप्त होतील. पालकांनी फक्त एसएमएसवर अवलंबून राहू नये. आर.टी.ई. पोर्टलवर प्रवेशाची तारीख अर्ज क्रमांक टाकून आपल्या अर्जाची स्थिती किंवा प्रवेशाचा दिनांक पहावा. प्रवेश घेण्याची तारीख पोर्टलवर दाखविली जाईल. त्या मुदतीतच पालकांनी पडताळणी समितीकडे जाऊन कागदपत्रे तपासून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी. ज्या विद्यार्थ्यांचे लॉटरी मध्ये निवड झालेली आहे. त्यांनी प्रवेशाकरिता एसएमएसद्वारा पुढील सूचना प्राप्त झाल्यानंतरच पडताळणी समितीकडे जावे. पडताळणी समितीकडे प्रवेश घेण्यासाठी सर्व पालकांनी गर्दी करू नये. तसेच जाताना आपल्या पाल्याला बरोबर घेऊन जाऊ नये. मुदतीनंतर संबंधित पालकांचा प्रवेशाचा हक्क राहणार नाही.

तसेच निवड यादीतील बालकांच्या पालकांना लॉकडाऊनमुळे बाहेरगावी असल्याने अथवा अन्य कारणामुळे पडताळणी समितीकडे जाऊन प्रत्यक्ष प्रवेश घेणे शक्य नसेल त्यांनी समितीशी संपर्क करून व्हॉअसप अन्य माध्यमांच्या द्वारे बालकाच्या प्रवेशाकरिता लागणारी आवश्यक कागदपत्रे सादर करावीत आपल्या पाल्याचा तात्पुरता प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन लातूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने केले आहे.

मुरुडच्या रुग्णांचे होम आयसोलेशन बंद करा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या