22 C
Latur
Friday, July 30, 2021
Homeलातूरमांजरा धरणात १७.८८ टक्के पाणीसाठा

मांजरा धरणात १७.८८ टक्के पाणीसाठा

एकमत ऑनलाईन

लातूर : लातूर शहराला पाणीपुरवठा होणा-या केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा धरणातील पाणीसाठा कमी होत चालला आहे. सध्या या धरणात १७.८८ टक्केच उपयुक्त पाणीसाठा राहिला आहे. मांजरा, निम्न तेरणा या दोन मोठ्या प्रकल्पांसह ८ मध्यम व १३२ लघू अशा एकुण १४२ प्रकल्पांत सध्या १९.१५ टक्के पाणीसाठा राहीला आहे. पावसाळ्यात धरणातील पाणीपातळी घसरत चालल्याने आता सर्वांच्या नजरा पावसाकडे लागल्या आहेत.

बीड, उस्मानाबाद आणि लातूर या तीन जिल्ह्यांसाठी अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या या मांजरा धरणाची साठवण क्षमता १७६.९६ दशलक्ष घनमीटर इतकी आहे. सध्या या धरणात ३१.६४० दशलक्ष घनमीटर आहे. याची टक्केवारी १७.८८ इतकी आहे. मृतसाठ्यात ४७.१३० दशलक्ष घनमीटर पाणी आहे. हे धरण गतवर्षी शंभर टक्के भरले होते. निम्न तेरणा प्रकल्पात ३८.४७९ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा असून त्याची टक्केवारी ४२.१८ इतकी आहे. जिल्ह्याच्या दृष्टीने तावरजा, व्हटी, रेणापूर, तिरु, देवर्जन, साकोळ, घरणी, मसलगा हे आठ मध्यम प्रकल्प अत्यंत महत्वाचे आहेत. या आठ मध्यम प्रकल्पाचा प्रकल्पीय उपयुक्त
पाणीसाठा १४.८२९८ दशलक्ष घनमीटर एवढा आहे. सध्या या आठ मध्यम प्रकल्पांत केवळ १२.१४ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे.

आठ मध्यम प्रकल्पांपैकी लातूर तालुक्यातील तावरजा हा मध्यम प्रकल्प कोरडा पडला आहे तर रेणापूर तालुक्यातील व्हटी प्रकल्पात ज्योत्याखाली पाणी गेले आहे. तिरु प्रकल्पातील पाणीसाठा शुन्यावर आला आहे. जिल्ह्यातील सिंचन आणि ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्यासाठी महत्वपूर्ण असलेले १३२ लघू प्रकल्प आहेत. त्याचा एकुण प्रकल्पीय उपयुक्त पाणीसाठा ३०५.१९ दशलक्ष घनमीटर आहे. सध्या या सर्व प्रकल्पांमध्ये मिळून एकुण ५९.३५ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा आहे. याची टक्केवारी १४.२३ इतकी आहे.

मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा (दलघमी)
प्रकल्पाचे नाव प्रकल्पीय पाणीसाठा सध्याचा पााणीसाठा
तावरजा        २०.४३      कोरडा
व्हटी           ८८.२७      ज्योत्याखाली
रेणापूर        २०.५५       १.२८९
तिरु           १५.२९       ०.००
देवर्जन        १०.६८       ३.०६६
साकोळ       १०.९५       १.४४९
घरणी          २२.४६      ४.६३५
मसलगा       १३.५९       ४.३८२
एकुण        १२२.१५      १४.८३०

दोन दिवसापासून २६ वन मजुरांचे धरणे आंदोलन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या