25 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeलातूरशहरातील १७ हजार व्यक्ती लसविना

शहरातील १७ हजार व्यक्ती लसविना

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
जीवघेण्या कोरोनाच्या तीन लाटा येऊन गेल्यानंतरही लातूर शहरातील १७ हजार २३४ व्यक्तींनी अद्याप लसीचा एकही डोस घेतलेला नाही. १ लाख १८ हजार ८११ व्यक्तींनी दुूसरा तर ३ लाख १५ हजार ९४६ हजार व्यक्तींनी प्रिकॉशन डोस घेतलेला नाही. शहरातील नागरिकांनी पहिला, दुसरा आणि प्रिकॉशन डोस घ्यावेत म्हणून लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने जनजागृती केली जात असली तरी त्यास प्रतिसाद मिळत नसल्याची बाब आकडेवारीवरुन समोर आली आहे.

कोरोनाची पहिली लाट लातूर जिल्ह्यात तशी उशिरानेच आली. उत्तर भारतातून दक्षीण भारतात जाणारे काही यात्रेकरुंनी निलंगा येथे मुक्काम केला आणि लातूर जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला. तेथूनच लातूर जिल्ह्यात कोरोनाची पहिली लाट सुूरु झाली. राज्यातील महानगरपालिका क्षेत्राचा विचार केला तर लातूर महानगरपालिका क्षेत्र काही काळ कोरोनामुक्त होते. कर्नाटकातील एक रुग्ण डोळ्याच्या शस्त्रक्रियेसाठी लातूरला आला आणि लातूर शहरात कोरोनाची लागण सुरु झाली. ती आजही कमी-अधिक प्रमाणात कायम आहे. शहरातील कोरोनाची पहिली लाट सर्वांसाठी नवीनच होती.

कोरोनाची लक्षणे काय?, त्यावरील उपचार काय?, काय काळजी घयावी? या सर्वच गोष्टी नवीन होत्या. तरीही लातूरातील नागरिकांनी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालण करुन कोरोनाच्या पहिल्या लाटेला तोंड दिले. नागरिकांची आणि सर्वच यंत्रणेची खरी परिक्षा घेतली ती कोरोनाच्या दुस-या लाटेने. कोरोनाची दुसरी लाट लातूर शहरासह जिल्ह्यासाठी भयंकर ठरली. या लाटेत कोरोनाचा वेग प्रचंड प्रमाणात वाढला होता. त्यामुळे रुग्णसंख्या प्रतिदिन चार ते पाच हजारांपर्यंत जायची. त्यामुळे उपलब्ध यंत्रणा कमी पडायची. व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेड मिळत नव्हते. कोरोनाने मृत्यू झालेल्यांची सर्वाधिक संख्या दुस-या लाटेतीलच आहे. तिसरी लाट मात्र त्रासदायक नव्हती. कारण या लाटेपर्यंत आरोग्य यंत्रणेने मोठ्या प्रमाणात व्यवस्था निर्माण केली होती. उपचार पद्धतीतही ब-याच गोष्टी आल्या होत्या. लसही आली होती. त्यामुळे तिसरी लाट सौम्य स्वरुपाची राहिली. आजही कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असले तरी लक्षणे सौम्य असल्यामुळे त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर नागरिकांनी ना मास्क वापरला ना लस घेतली. लातूर शहराचाच विचार केला तर अजूनही शहरात शंभर टक्के लसीकरण झालेले नाही. १८ वर्षांवरील पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची टक्केवारी ९५.३५, दुसरा डोस घेतलेले ६७.९१ टक्के, १५ ते १७ वयोगटातील पहिला डोस घेतलेल्यांची टक्केवारी १३०.८४, दुसरा डोस घेतलेले ८०.५९ टक्के, १२ ते १४ वयोगटातील पहिला डोस घेतलेल्यांची टक्केवारी ९८.४८ तर दुसरा डोस घेतलेल्यांची टक्केवारी ५२.३२ तर पिक्रॉशन डोस घेतलेल्यांची टक्केवारी ५.३५ एवढी आहे.

सौम्य लक्षणामुळे लसीकरणाकडे दुर्लक्ष
आजही लातूर शहरासह जिल्ह्यात दररोज ३० ते ३५ कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. असे असले तरी आढळलेल्या कोरोनारुग्णांत कोरोनाची लक्षणे सौम्य आहेत. एखादा रुग्ण रुग्णालयात तर जवळपास ९० टक्के रुग्ण घरीत उपचार घेत आहेत. कोरोनाबाधित रुग्णांत तीव्र लक्षणे नाहीत. त्यामुळे नागरीक कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहेत. लसीकरणाकडेही मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष आहे. शहरातील १७ हजार २३४ नागरिकांनी अद्याप एकही डोस घेतला नसल्याचे आकडेवारीवरुन समोर आले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या