25.6 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeलातूर१७०३ आशांना मिळणार औषधी कीट

१७०३ आशांना मिळणार औषधी कीट

एकमत ऑनलाईन

लातूर : योगिराज पिसाळ
नागरीकांचे आरोग्य सदृढ रहावे म्हणून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त लातूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून जिल्हयातील १ हजार ७०३ आशा स्वयंसेवीकांना प्राथमीक उपचाराची अद्यावत औषधी कीट दिली जाणार आहे. असा प्रायोगीक तत्वावरचा महाराष्ट्रात पहिलाच उपक्रम ऑगस्ट मध्ये आमलात येणार आहे. त्यामुळे जिल्हयातील नागरीकांना गावातल्या गावातच प्राथमिक उपचाराची सोय मिळणार असून आशांचेही सबलीकरण होण्यास मदत होणार आहे.

गावपातळीवर आशा स्वयंसेवीकांचा सर्व कुटूंबांशी विविध योजनांच्या माध्यमातून संवाद असतो. गावातील नागरीकांना ताप, सर्दी, खोकला, पोटदुखी असे सर्वसाधारण आजारांना सामोरे जावे लागते. या आजारांच्या उपचारासाठी प्राथमीक आरोग्य केंद्र अथवा इतर ठिकाणी जावे लागते. त्यामुळे वेळ व पैसाही खर्च होतो. प्राथमिक स्वरूपातील आजारावर मात करण्यासाठी जिल्हा परिषद गटातील १ हजार ७०३ आशा स्वयंसेवीकाना प्राथमिक उपचाराची अद्यावत किट लातूर जिल्हा परिषदेच्या १५ व्या वित्त आयोगातून १० लाख रूपये खर्च करून दिली जाणार आहे. या किटमध्ये ताप, सर्दी, खोकला, पोटदुखीवर उपचाराच्या औषधी, गोळया असणार आहेत. लहान अथवा किरकोळ जखमेवर उपचार करण्यासाठीची औषधी, तसेच किशोरवयीन मुलींच्या रक्तवाढीसाठी औषधी, लहान मुलांसाठी औषधी या शासनाच्या निर्देशानुसारच दिल्या जाणार आहेत.

कोरोना काळात लसीकरणासाठी आशा स्वयंसेवीकांनी गावपातळीवर महत्वपूर्ण भूमिका बजावली. त्यामुळे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून नागरीकांना गावातच आशा कार्यकर्तीच्या माध्यमातून प्राथमिक स्वरूपातील उपचारासाठी औषधी व गोळया ऑगस्ट मध्ये उपलब्ध होणार आहेत. विशेष म्हणजे ज्या आशा सक्षम आहेत. त्यांनाच गोळया व औषधींची किट दिली जाणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या