24.2 C
Latur
Tuesday, November 30, 2021
Homeलातूरजिल्हा बँक निवडणुकीत माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या पॅनलचे १८ उमेदवार बिनविरोध

जिल्हा बँक निवडणुकीत माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या पॅनलचे १८ उमेदवार बिनविरोध

एकमत ऑनलाईन

लातूर : राज्यात अग्रेसर असलेल्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या भाजपा पॅनलच्या उमेदवारांचे सर्वच अर्ज छाननीत बाद झाले. त्यामुळे काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख व पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या सहकार पॅनलचे १८ उमेदवार बिनविरोध निवडून आल्यात जमा आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे आज झालेल्या छाननीत एकच अर्ज काही मतदारसंघात राहिल्याने एक मतदारसंघ वगळता १८ जागांवर कॉंग्रेसचे उमेदवार विजयी झाल्यात जमा आहेत. आता फक्त निकालाची औपचारिकता बाकी आहे. त्यामुळे आज कॉंग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला.

जिल्हा बँकेच्या मार्केटिंग सोसायटी, कृषी औद्योगिक सहकारी संघ, प्रक्रिया सहकारी संस्था, सूतगिरणी, साखर कारखाने व बिज प्रक्रिया सहकारी संस्था मतदारसंघातून लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख, प्राथमिक कृषी पतपुरवठा व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था तसेच धान्य अधिकोष संस्थांचे प्रतिनिधी मतदारसंघातून आमदार बाबासाहेब पाटील (अहमदपूर), मारुती पांडे (जळकोट), नागनाथ पाटील (चाकूर) हे चार उमेदवार बिनविरोध निवडून आले. उर्वरित १५ जागांपैकी केवळ एका मतदारसंघात भाजपप्रणित उमेदवारांचा फॉर्म राहिलेला आहे. त्यामुळे ही जागा वगळता इतर १४ जागांवरील भाजप उमेदवारांचे अर्ज छाननीत बाद झाले. त्यामुळे या जागांवर केवळ काँग्रेस उमेदवारांचेच अर्ज राहिले आहेत. त्यामुळे १९ पैकी तब्बल १८ जागांवर कॉंग्रेस प्रणित पॅनलच्या उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्यात जमा आहे. आता फक्त यासंबंधीच्या घोषणेची औपचारिकता बाकी आहे.

त्यामुळे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुन्हा काँग्रेसच्या ताब्यात राहिली असून गेल्या ३३ वर्षांपासून जिल्हा बँकेत देशमुख परिवाराची एकहाती सत्ता राहिलेली आहे. आज झालेल्या उमेदवारी अर्ज छाननीत निवडणुकीचे चित्र स्पष्ट होताच जिल्ह्यात पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी सभासदांनी सर्वत्र फटाके फोडून आनंद व्यक्त केला.

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीचे पडघम वाजलेले असताना एकीकडे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, पालकमंत्री अमित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार पॅनलच्या वतीने १९ जागांसाठी ३४ फॉर्म दाखल करण्यात आले होते, तर दुसरीकडे विरोधी पक्ष भाजपाप्रणित पॅनलने ८३ फॉर्म दाखल केले होते. या सर्व अर्जांची जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी विजयकुमार ढगे यांनी छाननी केली. त्यांनी उमेदवारी अर्ज बाद व विधी ग्राह्या झालेल्या उमेदवारांची रात्री उशिरा यादी प्रसिद्ध केली आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या