24.3 C
Latur
Thursday, June 24, 2021
Homeलातूरतिस-या दिवशी झाल्या १८७६ चाचण्या

तिस-या दिवशी झाल्या १८७६ चाचण्या

एकमत ऑनलाईन

लातूर : महानगरपालिकेच्या वतीने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सुरु असणा-या विशेष चाचणी मोहिमेअंतर्गत गुरुवार दि. १३ ऑगस्ट रोजी १८७६ व्यावसायिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. यापैकी ७७ बाधित आढळले. चाचणीसाठी आल्यानंतर जे कर्मचारी आपल्या सुरक्षेसाठी मागील चार महिन्यांपासून अविरत कष्ट घेत आहेत त्यांचा सन्मान करावा. कोरोना विरुद्धच्या लढ्यात पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन महापौर विक्रांत गोजमगुंडे व उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी केले आहे.

कोरोना संसर्ग थांबवण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने विशेष चाचणी मोहीम राबवण्यात येत आहे. गुरुवारपासून लॉकडाऊन शिथिल होत असल्यामुळे पहिल्या टप्प्यात अत्यावश्यक सेवेतील व्यावसायिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. होलसेल व किरकोळ किराणा दुकानदार, त्यांचे कर्मचारी, भाजीपाला, दूध, फळ विक्रेते, वर्तमानपत्र वितरक, औषध विक्रेते व त्यांचे कर्मचारी, आरोग्य सेवक, पेट्रोल पंपावरील कर्मचारी मांस विक्रेते व स्वस्त धान्य दुकानदारांच्या चाचण्या या टप्प्यात करण्यात आल्या.

अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यांसाठी या चाचण्या पालिकेने बंधनकारक केल्या आहेत. पालिकेने निर्धारित केलेल्या सात केंद्रासह आणखी दोन ठिकाणी चाचण्या सुरु आहेत. गुरुवारी भाजी मार्केट परिसरात २००, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथील शिव छत्रपती ग्रंथालयात १५०, यशवंत शाळेत १५०, दयानंद महाविद्यालयात १५१, महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात १४८, राजस्थान विद्यालयात १२५, पुरणमल लाहोटी तंत्रनिकेतन येथील विलगीकरण केंद्रात १६९ तर समाज कल्याण वसतिगृह राहतील विलगीकरण केंद्रात ४७३ तपासण्या करण्यात आल्या. औषधी भवन येथेही ३१० तपासण्या झाल्या.

दिवसभरात एकूण तपासण्यात आलेल्या १८७६ व्यावसायांपैकी ७७ कोरोना बाधित आढळले. महानगरपालिकेचे कर्मचारी शहराला कोरोनामुक्त करण्यासाठी मागील चार महिन्यांपासून मेहनत घेत आहेत. लातूरकरांसाठी ते दिवस-रात्र परिश्रम घेत आहेत. स्वत:चा जीव धोक्यात घालून चाचण्या करत आहेत.त्यामुळे चाचणीसाठी आल्यानंतर व्यवसायिकांनी फूल देऊन त्यांच्याप्रती आदर व्यक्त करावा. कर्मचा-यांचा सन्मान करावा, असे आवाहन महापौर विक्रांत गोजमगुंडे व उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी केले.

पालिकेने मागच्या चार दिवसात मोठ्या प्रमाणात तपासण्या केल्या आहेत. यातून बाधित आढळणा-या रुग्णावर उपचार केले जात आहेत. कोरोनाचा प्रसार अधिक गतीने होऊ नये यासाठी नागरिकांनी अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे. सुरक्षित अंतर राखण्यासह सर्व प्रतिबंधात्मक उपाय करावेत. प्रशासनाच्या सूचनांचे वेळोवेळी पालन करावे, असे आवाहनही महापौर विक्रांत गोजमगुंडे व उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी केले आहे.

रेणापूर व शिरूर अनंतपाळ तालुक्यातील ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नियुक्ती

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
202FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या