21.1 C
Latur
Tuesday, September 28, 2021
Homeलातूरऔसा तालुक्यातील माळुंब्य्रात आढळले १९ पॉझिटिव्ह

औसा तालुक्यातील माळुंब्य्रात आढळले १९ पॉझिटिव्ह

एकमत ऑनलाईन

औसा : सध्याला राज्यात सर्वत्र कोरोना रुग्ण संख्या घटत असताना मंगळवारी औसा तालुक्यातील माळूब्रा गावात गेल्या आठ दिवसांत १९ कोरोना रुग्ण आढळले आहेत , बेलकुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय पथक विशेष तपासणी करण्यासाठी दाखल झाले आहे तर औसा तहसीलदार यांनी माळूब्रा गाव सील करण्याचे आदेश दिले आहे

माळूंब्रा या गावाची लोकसंख्या अंदाजे सहाशे आहे. भूकंपानंतर हे गाव दोन भागात विभागले आहे. पश्चिम भाग असलेल्या माळूंब्रा या गावातील एक व्यक्ती पीकविमा भरण्यासाठी औसा येथे आला होता . दरम्यान तो कोरोना पॉझीटीव्ह होता त्याची अधिक माहिती घेत इतर नागरिकांची तपासणी केली असता एकूण १८ नागरिक कोरोना पॉझिटीव्ह निघाले आहेत मंगळवारी बेलकुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ अमजद पठाण पथकासह दाखल झाले आहेत. गावातील इतर नागरिकांची कोरोना चाचणी सुरूअसून एक व्यक्ती असे एकूण १९ व्यक्ती कोरोना पॉजिटीव्ह निघाले आहेत. गावातील काही लोक कामानिमित्त औसा येथे कामासाठी जात असतात त्यातून कोरोनाचा प्रसार झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे तर खबरदारीचा उपाय म्हणून तहसीलदार शोभा पुजारी यांनी कोरोना रुग्ण आढळलेल्या माळूंब्रा गावाचा भाग सील करण्याचे आदेश दिले आहेत

औसा तहसीलदार शोभा पुजारी गटविकास अधिकारी सूर्यकांत भुजबळ यांच्या आदेशानुसार माळुंब्रा गाव सील करण्यात आले आहे. हे गाव दोन वस्तीत वसलेले आहे वरच्या गावामध्ये प्रतिबंधित क्षेत्र करण्यात आले आहे. दांड्या व बांबू लावून रस्ते बंद करण्यात आले आहेत नागरिकांना बाहेर न फिरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच तोंडाला मास्क वापरावे विनाकारण बाहेर फिरू नये अशा सूचना तलाठी निळकंठ जाधव यांनी दिल्या आहेत.

माळुंब्रा गावामध्ये दि २३ जुलै ला कोरोनाचे दोन रुग्ण आढळले २७ जुलै पर्यंत १९ वर कोरोना रूग्णाची संख्या गेली आहे माळुंब्रा येथील पंधरा कोरोना चे रुग्ण लातूर येथील कोव्हिड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत चार रुग्णांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे . बेलकुंड प्राथमिक आरोग्य केंद्रातच्या वतीने आज माळुंब्रा येथे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये कोरोना असलेल्या रुग्णाची तपासणी व लसीकरण ही करण्यात आले गावामध्ये वैद्यकीय अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी, आशा कार्यकर्ते सरपंच उपसरपंच या सर्वांनी मिळून प्रत्येकाच्या घरला जावून लसीकरण व कोव्हिड टेस्ट करुन घेण्याचे आवाहन ग्रामसेवक भानुदास पाटील यांनी केले आहे.

अटळ गच्छंती!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
194FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या