19 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeलातूरआरोपींकडून २ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

आरोपींकडून २ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

एकमत ऑनलाईन

उदगीर : या (नोव्हेंबर) महिन्यामध्ये मध्यरात्रीचे वेळी पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण हद्दीतील एका घरात अज्ञात चोरट्यांंनी प्रवेश करून घरातील साठ हजार रुपये किमतीचे चांदीची विविध भांडी चोरून नेल्या प्रकरणी पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी आरोपीकडे २ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून यातील आरोपींकडून तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.

या प्रकरणी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी निर्देशित करून महत्त्वाच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी उदगीर डॅनियल बेन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण पोलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे यांचे नेतृत्वात पोलीस पथक नेमून तपासाबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. या प्रकरणी करण्यात आलेल्या तपासात आरोपी अब्दुल्ला आबेद खान, वय २५ वर्ष, राहणार मेहंदीपटनम, हैदराबाद, राज्य तेलंगाना सध्या राहणार बागेशाम जवळ, बनशेळकी रोड, उदगीर यास दि २१ नोव्हेंबर २०२२ रोजी ताब्यात घेऊन त्यांच्याकडे गुन्ह्याबाबत विचारपूस केले असता, त्याने सदरच्या गुन्ह्याची कबुली देऊन गुन्ह्यात चोरलेला मुद्देमाल ६० हजार रुपये किमतीचे चांदीची भांडी काढून दिल्याने ते जप्त करण्यात आले आहे.

नमूद आरोपीकडे अधिक विचारपूस केली असता त्यानी उदगीर ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील बीएसएनएल कंपनीच्या कार्यालयातून अंदाजे १ लाख ५० हजार रुपये किमतीचे बॅट-या चोरल्याचे कबूल केले. नमूद गुन्ह्यात एकूण १ लाख ५० हजार रुपयांचा मोबाईल टॉवरच्या बॅट-यांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या प्रकरणी अधिक तपास पोलीस अंमलदार वेंकट शिरसे हे करीत आहेत. या प्रकरणी पोलीस निरिक्षक दीपककुमार वाघमारे यांचे नेतृत्वातील टीम मधील पोलीस पोलीस अंमलदार व्यंकट शिरसे, राहुल नागरगोजे, तुळशीराम बरुरे, राहुल गायकवाड, नामदेव चेवले, अभिजीत लोखंडे, नजीर बागवान यांनी घरफोडीच्या व मोबाईल टॉवरच्या बॅट-या चोरीच्या गुन्ह्याचा कौशल्यपूर्ण तपास करून गुन्ह्याची उकल करून गुन्हा उघडकीस आणून, गुन्ह्यात चोरलेला मुद्देमाल शंभर टक्के हस्तगत करण्याची कामगिरी बजावली आहे

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या