24.4 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeलातूरजिल्ह्यातील २ लाख ११ हजार बालकांवर होणार उपचार

जिल्ह्यातील २ लाख ११ हजार बालकांवर होणार उपचार

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
जिल्ह्यात अतिसार नियंत्रण पंधरवडा राबविण्यात येणार आहे. त्याअंतर्गत अतिसार झालेल्या कुपोषित बालकांवर उपचार करणे इत्यादींचा समावेश आहे. यामध्ये ग्रामीण भागातील १ लाख ७८ हजार ४० व शहरी भागातील ३३२५२ अशा एकूण २ लाख ११ हजार २९२ बालकांचा समावेश आहे. या मोहिमेत आशा स्वयंसेविका यांच्यामार्फत गावात प्रत्येक घरोघरी प्रत्येक दिवशी १०० ते १३० घरांना भेटी देण्यात येणार आहेत. दर दिवशी कार्यक्षेत्रात घरातील पालकांना एकत्री करुन ओ. आर. एस. द्रावण तयार करुन दाखविले जाणार आहे. तसेच स्वच्छतेचे महत्व पटवून हात धुण्याचे प्रात्यक्षिकही करुन दाखविले जाणार आहे.

येथील जिल्हाधिकारी कार्यालय दि. २७ जून रोजी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या अध्यक्षतेखाली अतिसार नियंत्रण पंरधरवडा राबविण्यासाठी जिल्हा कृती समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही वडगावे, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. अर्चना पंडगे यांनी मोहिमेबाबत सविस्तर माहिती दिली. या कालावधीत जनजागृती, अतिसारामध्ये घ्यावयाची काळजी तसेच क्षारसंजीवनी (ओआरएस) झिंक गोळया यांचा वापर, कसा करावा याबाबत आशा स्वयंसेविकांमार्फत प्रात्यक्षिके व ज्या घरात ५ वर्षापर्यंतची बालके आहेत. तेथे ओआरएस व झिंक गोळयांचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व आरोग्य संस्थेत ओ. आर.टी. कॉर्नर स्थापन करण्यात येणार आहे. अतिसार झालेल्या कुपोषित बालकांवर उपचार करणे इत्यादींचा समावेश आहे. यामध्ये ग्रामीण भागातील १७८०४० व शहरी भागातील ३३२५२ अशा एकूण २११२९२ बालकांचा समावेश आहे. या मोहिमेत आशा स्वयंसेविका यांच्यामार्फत गावात प्रत्येक घरोघरी प्रत्येक दिवशी १०० ते १३० घरांना भेटी देण्यात येणार आहेत.

दर दिवशी कार्यक्षेत्रात घरातील पालकांना एकत्री करुन ओ.आर.एस. द्रावण तयार करुन दाखविले जाणार आहे. तसेच स्वच्छतेचे महत्व पटवून हात धुण्याचे प्रात्यक्षिकही करुन दाखविले जाणार आहे. या बैठकीसाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रा. डॉ. महादेव बनसोडे, महिला व बाल कल्याण विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी गिरी व उप मुख्य कार्यकारी अधिकारी काळे तसेच जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधिक्षक, तालुका अरोग्य अधिकारी व इतर अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या