22.3 C
Latur
Wednesday, August 17, 2022
Homeलातूर२ लाख ७४ हजार ज्येष्ठांची बुस्टर डोसकडे पाठ

२ लाख ७४ हजार ज्येष्ठांची बुस्टर डोसकडे पाठ

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
कोरोनाच्या पहिल्या, दुस-या व तिस-या लाटेनंतर लातूर जिल्ह्यातील कोरोनाची तीव्रता कमी झाली. कोरोनाची सौम्य लक्षणे असल्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाकडे आता नागरीक लक्ष देत नाहीत, अशी परिस्थिती आहे. जिल्ह्यातील ६० वर्षांपुढील २ लाख ७४ हजार ५३७ जणांची निरधारीत वेळ संपलेली असतानाही बुस्टर डोस घेतलेला नाही. त्यामुळे आता आरोग्य विभागाने ‘हर घर दस्तक’, ही मोहीम सुरु केली आहे.

मार्च २०२२ नंतर दोन-अडीच महिने लातूर जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण नव्हते. आता पुन्हा जिल्ह्यात कोरोना पाय पसरु लागला आहे. त्यामुळे सर्वच यंत्रणा पुन्हा कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या कामाला लागली आहे. त्यात शंभर टक्के लसीकणाला प्राधान्य दिले जात आहे. ४५ वर्षे वयापुढील गटात ७ लाख ७८ हजार ८०० व्यक्तींपैकी ६ लाख ५६ हजार ८०३ जणांनी पहिला डोस घेतला आहे. ४५ वर्षांपुढील ७ लाख ७८ हजार ८०० पैकी ५ लाख ६० हजार ८३ जणंनी
दुसरा डोस घेतला आहे. त्याचे प्रमाण ७२ टक्के आहे. जिल्ह्यात कोरोना पुन्हा डोकेवर काढीत आहे. त्यामुळे सरकारने हर घर दस्तक ही मोहीम सुरु केली आहे. घरोघरी जाऊन लस न घेतलेल्यांची यादी तयार केली जात आहे.

त्यांना अंगणवाडी तसेच शाळांमध्ये जाऊन लस देण्याचे नियोजन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. विशेष करुन १२ ते १४, १५ ते १७ या वयोगटात लसीकणावर भर देण्यात आला आहे. जिल्ह्यातील आरोग्य विभागातील कर्मचारी, अंगणवाडी मदतनीस, आशा कार्यकर्ती यांच्यामार्फत हर घर दस्तक मोहिमेअंतर्गत लस न घेतलेल्यांची यादी करण्याचे काम जिल्ह्यात सुरु आहे. ज्यांनी लस घेतली नाही त्यांना घरी जाऊन लस दिली जात आहे. जुन महिन्यापासून ही मोहीम सुरु झाली आहे. १२ ते १४ आणि १५ ते १७ वयोगटात ज्यांनी लस घेतली नाही त्यांची यादी तयार करुन नजीकच्या अंगणवाडी किंवा शाळेत जाऊन त्यांना लस देण्यात येत आहे. कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या