27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeलातूर६२ लाखांचा २ टन चंदन जप्त

६२ लाखांचा २ टन चंदन जप्त

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
चंदनाच्या झाडांची अवैध तोड करून साठा करून ठेवलेल्या सताळा ता. उदगीर येथील फार्महाऊसवर कारवाई करत ६२ लाखांचा जवळपास २ टन चंदनाचा मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांची केली आहे.

पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी अवैध धंद्यावर कार्यवाही करण्याकरिता सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी व ठाणे प्रमुखांना आदेशित केले होते. त्या अनुषंगाने शुक्रवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास सहाय्यक पोलीस अधिक्षक निकेतन कदम यांना गुप्त माहिती मिळाली की, येरोळ मोडवरुन कबनसांगवी मार्गे एक सिल्व्हर रंगाचे मारूती सुझुकी अल्टो गाडीमधून प्रतिबंधीत व संरक्षित चंदन वृक्षाची लाकुड चोरी करुन चोरटी विक्री करण्यासाठी घेवुन जात आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने सहायक पोलिस अधीक्षक निकेतन कदम यांनी पोलीस निरीक्षक बाळकृष्ण मोहिते यांचे नेतृत्वात पोलीस स्टेशन चाकुर येथील अधिकारी व आमलदारांचे पथक तयार करून त्यांना मार्गदर्शन व सूचना देऊन रवाना केले.

कबनसांगवी जवळ एक सिल्व्हर रंगाची एमएच १२ जेसी ३९३५ ही कार येत असल्याची दिसली. पथकाने सदर गाडीस थांबवण्याचा इशारा केला असता ती गाडी न थांबवता पुढे निघून गेली. सदरची गाडी थोडया अंतरावर थांबण्यास भाग पाडुन सदर गाडीतील व्यक्तीस गाडी खाली उतरवुन तपासणी केली असता गाडीमध्ये ११ बॅग चंदन दिसुन आले. सदर व्यक्तीस नाव पत्ता विचारता त्याने साईनाथ अश्रृबा पुट्टे वय ४३ रा. सताळा ता. उदगीर असे असल्याचे सांगुन त्याने वेगवेगळ्या ठिकाणाहुन आलेला माल तो त्याचे शेतातील आखाडयावर सताळा ता. उदगीर येथे ठेवत असल्याची माहिती दिली. त्यावरून त्याच्या फार्महाऊसवर गेले असता आखाडयाचे शेडचे पाठीमागील बाजुस अशोक लिलँड ट्रक मध्ये दोन व्यक्ती चंदनाच्या धपल्या व लाकडे भरत असल्याचे दिसले.

त्यांच्याकडे विचारपूस करून साईनाथ पुट्टे यांचे शेडचे समोरील उकंडयाचे बाजुस असलेल्या हौदात उतरुन पाहणी केली असता त्यात चंदनाचे लाकडे व धपल्या असलेल्या बॅग मिळून आल्या. या कारवाईमध्ये जवळपास ४० लाखाचे २ टन चंदन आणि इतर असा ६२ लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या प्रकरणी पाराजी पुठ्ठेवाड यांच्या फिर्यादीवरून चाकूर पोलीस ठाण्यात साईनाथ अश्रृबा पुट्टे रा. सताळा ता. उदगीर, लतीफ अहमद कुट्टी, गिरीशकुमार वेल्लुतिरी दोघे रा. केरळ यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरील चंदनाचे मुद्देमाल कुठे वाहतूक केला जातो. त्याबद्दल अधिक तपास करण्यात येत आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या