27 C
Latur
Monday, September 28, 2020
Home लातूर २१ लाख मे. टन ऊस गाळप होणार

२१ लाख मे. टन ऊस गाळप होणार

एकमत ऑनलाईन

लातूर (योगीराज पिसाळ): लातूर जिल्हयात हरभरा, तूर, सोयाबीन नंतर ऊस पिकाकडे नगदी पिक म्हणून शेतकरी पाहतात. कृषि विभागाच्या अहवालानुसार जिल्हयात यावर्षी शेतक-यांनी २६ हजार ४७० हेक्टर क्षेत्रावर ऊस पिकाची लागवड केली आहे. ऊस तोडीचा हंगामही दीड ते दोन महिण्यावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे यावर्षी लातूर जिल्हयात साखर कारखान्यांच्यामाध्यमातून २१ लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप होईल असा अंदाज वर्तवला जात आहे.

लातूर जिल्हयात गेल्यावर्षी ऑगस्ट पर्यंत दुष्काळ सदृश्य परिस्थिती होती. नंतर झालेल्या परतीच्या पावसा जिल्हयातील पिण्याच्या पाण्याचा व पिकांचाही कांही प्रमाणात प्रश्न मार्गी लागला होता. या पावसाच्या आधारावरच शेतक-यांनी पाण्याचा काटकसरीने वापर करत ठिबक सिंचनाद्वारे ऊसाचे पीक जोपासले. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी पाऊस समाधानकारक असला तरी अद्याप मोठया पावसाची नितांत गरज आहे. गेल्यावर्षी शेतक-यांनी ८४ हेक्टर क्षेत्रावर आडसाली (जून-जुलै) ऊसाची लागवड केली. डिसेंबर ते जानेवारी दरम्यान ११ हजार ४५० हेक्टर क्षेत्रावर ऊसाची लागवड झाली.

पूर्व हंगामी (ऑक्टोबर-नोव्हेबर) ६ हजार ५४ हेक्टरवर लागवड, तर तोडणी झालेला ८ हजार ३५० हेक्टर क्षेत्रावरील खोडवा ऊसाची शेतक-यांनी जोपासना केली असून असा २६ हजार ४७० हेक्टर क्षेत्रावरील ऊस यावर्षी गाळपासाठी उपलब्ध असणार आहे. गेल्यावर्षी पेक्षा यावर्षी ऊसाचे क्षेत्र वाढले असून येत्या दीड-दोन महिण्यात ऊस तोडणी हंगामास सुरूवात होणार आहे.

गेल्यावर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्हयात ऊसाचे क्षेत्र अल्प प्रमाणात होते.त्यामुळे लातूर जिल्हयातील १४ साखर कारखान्यापैकी तीन खाजगी साखर कारखान्यांचा ऊसाचा गळीत हंगाम पार पडला.जिल्हयातील जागृती शुगर लि. तळेगाव या साखर कारखान्याने ३ लाख ७४ हजार ६२९ मेट्रीक टन सर्वाधिक ऊसाचे गाळप करून ४ लाख ३ हजार ६०० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले. सिध्दी शुगर लि. उजना साखर कारखान्याने २ लाख ५८ हजार ४० मेट्रीक टन ऊसाचे गाळप करून २ लाख ६८ हजार ३१० क्विंटल साखर उत्पादन, तर साईबाबा शुगर लि. गोंद्री या साखर कारखान्याने ८ हजार ६२४ मेट्रीक टन ऊसाचे गाळप करून ३ हजार ८०५ क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. जिल्हयातील तीन खाजगी साखर कारखान्यांच्या माध्यमातून ६ लाख ४१ हजार २९५ मेट्रीक टन ऊसाचे गाळप झाले. या ऊस गाळपातून ६ लाख ७५ हजार ७१५ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. तर १०.५४ असा साखर उतारा राहिला.

ऊसाचे ८००० हेक्टर क्षेत्र वाढले
लातूर जिल्हयात गेल्यावर्षी १८ हजार ६८ हेक्टरवरऊस गाळपासाठी उभा होता. तर यावर्षी २६ हजार ४७० हेक्टर क्षेत्रावरील ऊस गाळपासाठी उपलब्ध असणार आहे. गेल्यावषीपेक्षा यावर्षी ८ हजार ४०२ हेक्टर क्षेत्र ऊसाचे वाढले आहे. यावर्षी पाऊस वेळो-वेळी पडत असल्याने सध्या पिक परिस्थितीत चांगली आहे.

ऊसाचे गाळपही वाढणार
जिल्हयात गेल्यावषी ६ लाख ४१ हजार २९५ मेट्रीक टन ऊसाचे गाळप झाले होते. तर यावर्षी प्रादेशिक सहसंचालक साखर, नांदेड यांच्याकडे आलेल्या माहितीनुसार ३० हजार १०० हेक्टर क्षेत्रावर उभा असलेल्या ऊसाचे २१ लाख ७ हजार मेट्रीक टन गाळप होईल असा अंदाज वर्तवला आहे.

उपमूख्यमंत्री अजीत पवारांच्या फोनला ओव्हरटेक काँग्रेस विरोधीपक्ष नेता पदावर ठाम

ताज्या बातम्या

पंजाबमध्ये आंदोलनाला हिंसक वळण; कार्यकर्त्यांनी ट्रक पेटवला!

दिल्ली : कृषी विधेयकांना मंजुरी मिळाल्यानंतर देशभरातील शेतकरी आक्रमक झाल्यानंतर, आता काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी पंजाबमध्ये शेतकरी आंदोलनात भाग घेणार असल्याचं काँग्रेसच्या...

हरामखोर हा शब्द कुणाला उद्देशून काढला होता, हे न्यायालयात सांगितले पाहिजे; मुंबई उच्च न्यायालयाने दिले आदेश

मुंबई - अभिनेत्री कंगना राणौतच्या कार्यालयावर करण्यात आलेल्या कारवाई प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये जोरदार दावे-प्रतिदावे करण्यात आले. सुनावणीदरम्यान विवादित हरामखोर शब्दावरूनही वादळी युक्तिवाद...

कोरोनाबाधिताने केली गळा कापून घेऊन आत्महत्या ; नातेवाईकांना आत्महत्येविषयी संशय

सांगली- जिल्ह्यातील मिरज कोविड रुग्णालय (शासकीय वैद्यकीय महाविद्यालय) मध्ये मध्यरात्री एका कोरोनाबाधिताने गळा कापून घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. मिरज-मालगाव...

मुलाने विवाहित महिलेला पळवले, आई-वडिलांनी बदनामीच्या भीतीने केली आत्महत्या

जोधपूर : राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यात मुलगा विवाहित महिलेसह पळून गेल्याने त्याचे पालक अस्वस्थ झाले. बदनामीच्या भीतीने या दोघांनीही स्वत: गळफास घेत आत्महत्या केली. शहरात अनलॉक...

आयपीएस अधिकाऱ्याची पत्नीला मारहाण, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पदावरून हटवले

मध्य प्रदेश : मध्य प्रदेशमध्य प्रदेशचे स्पेशल डीजी पुरुषोत्तम शर्मा यांचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत असून, ज्यात ते पत्नीला मारहाण करत आहेत....

किरीट सोमय्या यांनी पालिका कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन; महापौरांच्या हकालपट्टीची मागणी

मुंबई : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. याप्रकरणी त्यांनी आज मुंबई मनपा कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन...

शिवसेनेनं भाजपसोबत यावं; रामदास आठवलेंनी घातली साद

मुंबई: शिवसेनेनं भाजपसोबत यावं अशी साद रिपाईंचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी घातली आहे. शिवसेनेला काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सरकार चालवताना अडचणी येत आहेत. अनेकदा...

माणुसकीला काळीमा : गर्भवतीच्या पोटातच जुळ्यांचा मृत्यू; कोरोनामुळे दाखल करून घेण्यास नकार

मल्लपुरम : कोरोना काळात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. रुग्णालयाच्या बेजबाबदारपणामुळे गर्भवती महिलेच्या पोटातच जुळ्यांचा मृत्यू झाला आहे. केरळमधील रुग्णालयांच्या दुर्लक्षामुळे गर्भवती महिलेच्या पोटात...

ट्रेंड ड्रोन पायलटशिवाय कोणीही आता ड्रोन उडवू शकणार नाही ; 13 फ्लाइंग अ‍ॅकॅडमींना मान्यता

नवी दिल्ली : ड्रोनचे जितके फायदे आहेत तितकेच काही धोके देखील आहेत. परंतु अशा प्रकारच्या धोक्‍यांबद्दल आधीपासूनच अलर्ट राहिले तर ते टळू शकतात. हेच कारण...

संभाजीराजेंनी घेतली उदयनराजेंच्या बहिणीची भेट

नाशिक : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज नाशिकमध्ये भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या बहिणीची भेट घेतली. खासदार संभाजीराजे हे नाशिक दौऱ्यावर आहे. आज सकाळी...

आणखीन बातम्या

लातूर : जिल्ह्यात २२३ नवे रुग्ण; आणखी ४ जणांचा मृत्यू

लातूर : जिल्ह्यात कोरोनामुक्त होणाºया रुग्णांचे प्रमाण वाढले असले, तरी नव्या रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. आज जिल्ह्यात २२३ नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे...

कृषीमंत्री भुसे यांनी केली नुकसानग्रस्त पिकांची पाहणी

जळकोट (प्रतिनिधी) : यंदा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात खूप पाऊस झाला आहे त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, महाराष्ट्र सरकारने पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले...

शिरुर अनंतपाळ तालुक्यात नेटवर्कअभावी ऑनलाईन प्रणाली बंद

शिरूर अनंतपाळ : तालुक्यात नेटवर्क अभावी संपूर्ण ऑनलाईन प्रणाली बंद पडलीली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बीएसएनलची लाईन कट होत असल्याने नेटवर्क सेवा सतत खंडीत...

सप्टेंबरच्या २६ दिवसांत ८३१५ कोरोनाबाधितांची भर

लातूर (प्रतिनिधी) : गेल्या सहा महिन्यांत लातूर जिल्ह्यातील कोरोनाचा मीटर पाहिला तर सप्टेंंबर २०२० या महिन्यात कोरोनाचा मीटर अतिवेगाने धावत असल्याचे लातूर जिल्हा शल्य...

सोयाबीन काढणीसाठी शेतक-यांची कसरत

भेटा (श्रीधर माने) : औसा तालुक्यातील सोयाबीन हेच खरिपातील प्रमुख पीक आहे. हंगामाच्या सुरुवातीला पावसाने हुलकावणी दिल्याने हंगाम धोक्यात. शेतक-यांनी अल्पशा पावसावर पिकांची जोपासना...

जळकोट तालुक्यात अनेक गावांत उसाचे नुकसान

जळकोट (प्रतिनिधी) : जळकोट तालुक्यात गत आठवड्यात झालेल्या वादळी वारे तसेच अतिवृष्टीमुळे उसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, तालुक्यातील इतर खरीप पिकाचे नुकसान झालेच...

ग्रामीण मुला-मुलींच्या दारापर्यंत रुजविले इंग्रजीचे धडे

पोहरेगाव (शरद राठोड ): मागील सहा महिन्यांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आला होता. वाढत्या संसर्गामुळे मानवी जीवन पूर्णत: विस्कळीत झालेले आहे.त्यामुळे प्रशासनाकडून महाविद्यालय, शाळा...

२५९ नवे रुग्ण : लातूर जिल्ह्यात ३४६ रुग्णांनी कोरोनावर केली मात; २ बाधितांचा मृत्यू

लातूर : जिल्ह्यातील रुग्णसंख्येत सातत्याने चढउतार पाहावयास मिळत आहे. आज शनिवार दि. २६ सप्टेंबर रुग्ण आणि मृतांच्या संख्येत दिलासाजनक घट पाहावयास मिळाली. त्यातच साडेतीनशेच्या...

लातूर शहरातील ४८७३ रुग्ण बरे होऊन घरी परतले

लातूर :लातूर शहर महानगरपालिका हद्दीत दि. २५ सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत २३५ अँटिजेन व २५ आरटीपीसीआर याप्रमाणे एकूण २६० कोविड तपासणी करण्यात आली....

शेतकरी तिहेरी संकटाने हवालदील

जळकोट (ओमकार सोनटक्के) : जळकोट तालुक्यातील शेतक-यांना २०२० हे साल अतिशय खरतड साल असल्याचे दिसून येत आह.यावर्षी एकामागून एक संकटाची मालिका शेतक-यांचा पाठलाग सोडतांना...
1,269FansLike
118FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...