22.1 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeलातूर२१ हजार विद्यार्थी देणार आज ‘नीट’ची परीक्षा

२१ हजार विद्यार्थी देणार आज ‘नीट’ची परीक्षा

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
बारावी विज्ञान शाखेच्या वैद्यकीय क्षेत्रात करिअर करु इच्छिणा-या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्वाची असलेली ‘नीट’ची परीक्षा आज दि. १७ जुलै रोजी होत आहे. जिल्ह्यात या परीक्षेकरीता ४२ केंद्र असून सुमारे २१ हजार ५०० विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. दोन-अडीच वर्षांच्या कोरोनाच्या पार्श्वभुमीवर ही परीक्षा होत आहे. जिल्ह्यात ४२ केंद्रांवर आज परीक्षा घेतली जाणार आहे. २१ हजार ५०० विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. दुपारी २ ते ५ यावेळेत ही परीक्षा होणार आहे. कोरोना संपलेला नसल्याने परीक्षा केंद्राचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. कोरोनाच्या संदर्भात असलेल्या सर्व उपाय योजना सर्वच केंद्रांवर असणार आहेत. एकाच वेळी विद्यार्थ्यांची गर्दी होवू नये म्हणुन सकाळी ११ वाजल्यापासून विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणार आहे. दीड वाजेपर्यंत हा प्रवेश असणार आहे. विद्यार्थ्यांनी स्वत:सोबत कोरोनाचा प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून मास्क, सॅनिटायझर, ओळखपत्र, अ‍ॅडमीट कार्डही सोबत आणणे बंधनकारक आहे.

‘नीट’ परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांचे यंदा प्रथमच बायोमॅट्रीक्स होणार आहे. तसेच प्रत्येक वर्गात परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांवर सीसीटीव्ही कॅमे-याद्वारे नजर ठेवली जाणार आहे. परीक्षा सुरळीत पार पडावी, यासाठी आवश्यक त्या सर्व बाबींची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. या परीक्षेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. एखाद्या विद्यार्थ्याला अ‍ॅडमिट कार्डसंदर्भात काही अडचणी असतील तर त्या संबंधित केंद्रावर तातडीने सोडवल्या जाणार आहेत. कोणत्याही विद्यार्थ्याला परत पाठवू नये, अशा सूचना संबंधीत केंद्र प्रमुखांना देण्यात आल्या आहेत, असे लातूरच्या नीट परीक्षेचे समन्वयक प्राचार्य गिरीधर रेड्डी यांनी सांगीतले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या