26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeलातूरलातूर जिल्ह्यात कोविडचे २२८२ बेड्स शिल्लक

लातूर जिल्ह्यात कोविडचे २२८२ बेड्स शिल्लक

एकमत ऑनलाईन

एजाज शेख लातूर : लातूर जिल्ह्यात विविध २२ संस्थांमध्ये कोविड उपचार केंद्र सुरु करण्यात आलेले आहेत. या २२ संस्थांमध्ये एकुण २९८९ बेड्सची व्यवस्था करण्यात आलेली आहे. दि. ३० जुलै रोजीच्या अहवालानूसार या २२ संस्थांमध्ये ७०७ कोविड रुग्ण उपचारासाठी भरती झालेले असून २२८२ कोविड बेड्स शिल्लक असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या अहवालात देण्यात आलेली आहे.

लातूर शहरातील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत १०० बेड्स आहेत. या संस्थेत २५ रुग्ण उपचार घेत आहेत तर ७५ बेड्स शिल्लक आहेत. विलासराव देशमुख शासकीय विज्ञान संस्थेच्या गांधी चौकातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील डेडीकेटेड कोविड केअर सेंटरमध्ये २०१ बेड्स आहेत. या संस्थेत १७२ रुग्ण उपचार घेत असून २९ बेड्स शिल्लक आहेत. उदगीरच्या सामान्य रुग्णालयातील १०० बेड्सपैकी ४१ बेड्सवर रुग्ण भरती आहेत ५९ बेड्स शिल्लक आहेत.

उदगीर तालुक्यातील तोंडार पाटीवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर बौद्ध निवासी शाळेतील कोविड सेंटरमध्ये १८० बेड्स आहेत. या संस्थेत ३५ रुग्ण उपचार घेत असून १४५ बेड्स शिल्लक आहेत. लातूर जवळील १२ नंबर पाटीलवरील एक हजार मुला-मुलींच्या वसतिगृहात १००० बेड्स आहेत. तेथे २०४ रुग्ण असून ७९६ बेड्स शिल्लक आहेत. अहमदपूर तालुक्यातील मरशिवणी येथील मुलांच्या शासकीय निवासी शाळेत १५० बेड्स आहेत. ४७ रुग्ण भरती असून १०३ बेड्स शिल्लक आहेत. औसा येथील मुलांच्या शासकीय निवासी शाळेत १०० बेड्स आहेत. ६० रुग्ण या शाळेत उपचार घेत आहेत तर ४० बेड्स शिल्लक आहेत.

निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयात ५० बेड्स आहेत तिथे ७ रुग्ण उपचार घेत आहेत तर ४३ बेड्स शिल्लक आहेत. निलंगा तालुक्यातील दापका येथील कोविड केअर सेंटरमध्ये १०० बेड्स आहेत. ३३ रुग्ण भरती असून ६७ बेड्स शिल्लक आहेत. देवणी येथील शासकीय वसतिगृह न्यु. बिल्डींगमध्ये ७७ बेड्स आहेत. ९ रुग्ण उपचार घेत आहेत तर ६८ बेड्स शिल्लक आहेत. चाकुर येथील कृषी पी. जी. कॉलेजमधील केंद्रात १०० बेड्स आहेत. २२ रुग्ण दाखल आहेत तर ७८ बेड्स शिल्लक आहेत. रेणापूर तालुक्यातील बावची येथील मुलांचे शासकीय निवासी शाळेत १०८ बेड्सची व्यवस्था आहे. या संस्थेत ३ रुग्ण उपचार घेत आहेत तर १०५ बेड्स शिल्लक आहेत.

लातूर शहरातील विवेकानंद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये १०० बेड्स आहेत. या ठिकाणी ४ जण उपचार घेत आहेत तर ९६ बेड्स शिल्लक आहेत. लातूर येथील फुलाबाई बनसोडे हॉस्पिटलमध्ये ५० बेड्स आहेत. २५ रुग्ण भरती असून २५ बेड्स शिल्लक आहेत. लातूरमधील अल्फा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ५० बेड्स पैकी १७ बेड्सवर रुग्ण असून ३३ बेड्स शिल्लक आहेत. लातूर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ७५ बेड्स आहेत. ३ रुग्ण भरती आहेत तर ७२ बेड्स शिल्लक आहेत. कव्हा रोडवरील समाज कल्याण हॉस्टेलमध्ये ४८ बेड्स आहेत. या ठिकाणी एकही रुग्ण नाही.

४८ बेड्स शिल्लक आहेत. एमआयएमएसआर मेडीकल कॉलेजमध्ये १०० बेड्स आहेत. एकही रुग्ण भरती नाही. १०० बेड्स शिल्लक आहेत. उदगीरमधील उदयगिरी लायन्स आय हॉस्पिटलमध्ये ५० बेड्स आहेत. ते सर्वच्या सर्व शिल्लक आहेत. जळकोट येथील समाजकल्याण हॉस्टेलमध्ये असलेले ५० बेड्स शिल्लक आहेत. निलंगा तालुक्यातील जाऊ येथील मुलांच्या वसतिगृहातील १०० बेड्स असून ते सर्व १०० बेड्स शिल्लक आहेत. लामजना येथील सामाजिक न्याय भवनातील १०० पैकी १०० बेड्स शिल्लक आहेत.

सहा कोविड सेंटरमध्ये रुग्ण संख्या निरंक
कव्हा रोडवरील समाज कल्याण हॉस्टेल, एमआयएमएसआर मेडीकल कॉलेज, उदयगिरी लायन्स आय हॉस्पिटल, समाज कल्याण हॉस्टेल जळकोट, सामाजिक न्यायभवन लामजना व निलंगा तालुक्यातील जाऊ येथील मुलांचे शासकीय वसतिगृह या सहा कोविड केअर सेंटरमध्ये एकुण ४४८ बेड्सची व्यवस्था आहे. परंतु, जिल्हा शल्य चिकित्सकांच्या दि. ३० जुलैच्या अहवालानूसार या सहा सेंटरमध्ये आजघडीला रुग्ण संख्या निरंक आहे.

Read More  एकवीस लाखाचे एन95 मास्क जप्त एकाला अटक

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या