रेणापूर : रेणापूर तालुक्यात आरोग्य विभागाने कोरोना विषाणूच्या नियंत्रणासाठी माझं कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेचा पहिला टप्पा यशस्वीपणे राबविला . १६ ऑक्टोबर पासून या मोहिमेतील दुस-या टप्याला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्यात २६ हजार ४६४ घरांचा सर्वे करुन एक लाख २३ हजार ९९३ कुटुंबांची आरोग्य तपासणी करण्यात आली . या तपासणीमध्ये आरोग्य विभागाच्या पहिल्या टप्यातील अहवालात कोरोनाबाधीत २३ तर इतर आजारांचे आठ हजार ९८१ रूण आढळून आले आहेत. या मोहिमेच्या दुस-या टप्याला १६ ऑक्टोबरपासून सुरुवात झाली आहे
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने माझं कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला. या मोहिमेच्या पहिल्या टप्यात आरोग्य विभागाच्या टिममधील १११ तपासणी पथकामार्फत तालुक्यातील प्रत्येकांच्या घरी जाऊन आरोग्याची तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये विविध रोगांचे अनेक रुग्ण आढळून आले . सदरच्या तपासणीमुळे विविध रोगांवर उपचार करण्यास मदत झाली. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या आरोग्याची इत्यंभूत माहिती मिळाल्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यास व नागरीकांच्या, रुग्णांच्या आरोग्यासंबंधीच्या अडचणी सोडविण्यासाठी शासकीय यंत्रणेला मदत होत असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ . नारायणराव देशमुख यांनी सांगीतले .
तालुक्यात एकूण २६ हजार ४८५ घरांमध्ये एक लाख ३१ हजार ७६५ कुटुंब संख्या असलेल्या एकूण १ लाख २३ हजार ९९३ कुटुंब सदस्यांचा सर्वे करण्यात आला. या सर्वेक्षणामध्ये प्रत्येक कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. आत्तापर्यंतच्या तपासणीमध्ये विविध रोगांचे एकूण ८ हजार ९८१ रुग्ण आढळून आले आहेत . त्यात आयएलआय सारीचे ३८४ , ऑक्सिजन कमी असलेले २८२, मधुमेह असलेले एक हजार ८४४ , उच्च रक्तदाबाचे एक हजार ९०० , किडणी आजाराने त्रस्त असलेले २४ , लिव्हरचे २ ४८, इतर ४५० , दुर्धर आजाराचे ४ हजार ७३१ , संदर्भ सेवा दिलेल्या व्यक्तीपैकी स्वॅब घेतलेल्या व्यक्ती ७१ ( ५० वर्षावरील ) , संदर्भ सेवा दिलेले २२४ तर कोरोना पॉझीटीव्ह असलेले २३ रुग्ण आढळून आल्याचे पहिल्या टप्यातील माझे कुटुंब माझी जबाबदारी अंतर्गत झालेल्या तपासणीच्या अहवालातून दिसून येते.
आरोग्याबाबत सतर्कता बाळगावी
माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियानांतर्गत आरोग्य पथकांनी घरोघरी जाऊन प्रत्येकांच्या आरोग्याची तपासणी केल्यामुळे कोरोनासह अन्य विविध आजारांची माहिती संकलन करता आली त्यानुसार रुग्णांवर वेळेवर उपचार मिळण्यास मदत होत आहे. दुस-या टप्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरीकांनीही सतर्कराहून मास्कचा वापर करावा , फिजीकल डिस्टन्स राखावा , तसेच मोहिमेस प्रतिसाद द्यावा, असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नारायणराव देशमुख यांनी केले आहे.
२८ गावांत एकही बाधित नाही
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुक्यातील प्रत्येक गावात तहसील , पोलीस प्रशासन व आरोग्य विभागाकडून कोरोनासंदर्भात जनजागृती करण्यात आली तसेच जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या संकल्पनेतून अँन्टी कोरीना फोर्सची स्थापना करण्यात आली. प्रत्येक गावांत बाहेरून येणा-या -जाणा-यावर पाळत ठेवून २८ गावांतील नागरीकांनी आवश्यक ती खबरदारी घेतल्यामुळे पहिल्या टप्यात या गावांमध्ये एकही कोरोनाबाधीत रुग्ण आढळला नाही. त्यांनी पहिल्या टप्यात कोरोनाला गावच्या वेशीवरच रोखण्यात यश मिळविले आहे
शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी घरोघरी जाऊन शिक्षण