33.7 C
Latur
Saturday, February 27, 2021
Home लातूर लातूर जिल्ह्यात कोविडचे २४०० बेड्स शिल्लक

लातूर जिल्ह्यात कोविडचे २४०० बेड्स शिल्लक

एकमत ऑनलाईन

लातूर : गेल्या काही दिवसांत लातूर शहर आणि जिल्ह्यात दररोज कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या रुग्णांची सोय म्हणून लातूर जिल्ह्यातील विविध ३२ संस्थामधून ४३२० बेड्स उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. या संस्थामध्ये आजघडीला १९२० रुग्ण भरती असून कोविडचे २४०० बेड्स शिल्लक आहेत, अशी माहिती लातूर जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे.

लातूर शहरातील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था व सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये ३१० बेड्सची व्यवस्था आहे. या संस्थेत २४६ रुग्ण भरती असून ६४ बेड्स शिल्लक आहेत. उदगीरच्या सामान्य रुग्णालयात १०० बेड्स आहेत त्यापैकी ५३ रुग्ण भरती असून ४७ बेड्स शिल्लक आहेत. उदगीरच्याच लायन्स हॉस्पिटलमध्ये ५० बेड्स पैकी १७ बेड्सवर रुग्ण भरती आहेत तर ३३ बेड्स शिल्लक आहेत. उदगीरमधील जयहिंद सैनिक शाळेत १०० बेड्स आहेत. तेथे ४६ रुग्ण भरती असून ५४ बेड्स शिल्लक आहेत.

उदगीर तालुक्यातील तोंडार पाटीवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर बौद्ध निवासी शाळा कोविड केअर सेंटरमध्ये १८० बेड्सपैकी ७२ बेड्सवर रुग्ण भरती असून १०८ बेड्स शिल्लक आहेत. १००० मुला-मुलींचे वसतीगृह १२ नंबर पाटी लातूर येथे १००० बेड्स आहेत. येथे ३१३ रुग्ण भरती असून ६८७ बेड्स शिल्लक आहेत. मुलांची शासकीय निवासी शाळा मरशिवणी ता. अहमदपूर येथे १५० बेड्स आहेत. ५६ रुग्ण भरती आहेत तर ९४ बेड्स शिल्लक आहेत. मुलांची शासकीय निवासी शाळा औसा येथे १०० बेड्स आहेत. ९६ रुग्ण भरती आहेत तर ४ बेड्स शिल्लक आहेत. उपजिल्हा रुग्णालय निलंगा येथे ५० बेड्स आहेत. येथे २५ रुग्ण भरती असून २५ बेड्स शिल्लक आहेत. कोविड केअर सेंटर दापका ता. निलंगा येथे १०० बेड्सपैकी ८६ रुग्ण भरती असल्याने १४ बेड्स शिल्लक आहेत.

मुलांचे शासकीय वसतीगृह जाऊ ता. निलंगा येथे १०० बेड्स आहेत. येथे १६ रुग्ण भरती आहेत तर ८४ बेड्स शिल्लक आहेत. शासकीय वसतीगृह न्यु. बिल्डींग देवणी येथे ७७ बेड्स आहेत. २६ रुग्ण भरती असून ५१ बेड्स शिल्लक आहेत. कृषी पी. जी. कॉलेज चाकुर येथे १५० बेड्स उपलब्ध आहेत. तेथे ७५ रुग्ण भरती असून ७५ बेड्स शिल्लक आहेत. मुलींची शासकीय निवासी शाळा बावची ता. रेणापूर येथे १०८ बेड्स आहेत. तेथे ३० रुग्ण भरती असून ७८ बेड्स शिल्लक आहेत. सामजिक न्याय भवन लामजना येथे १५० बेड्स आहेत.

तथे ७० रुग्ण भरती ओहत तर ८० बेड्स शिल्लक आहेत. बिडवे अभियांत्रिकी मुलींचे वसतीगृह मनपा लातूर ये ४०० बेड्स उपलब्ध आहेत. तिथे ४५ रुग्ण भरती आहेत तर ३५५ बेड्स शिल्लक आहेत. पूरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात २०० बेड्स आहेत. १६९ रुग्ण भरती असून ३१ बेड्स शिल्लक आहेत. संभाजी केंद्रे महाविद्यालय जळकोट येथे ६० बेड्स आहेत तर ४३ रुग्ण भरती असून १७ बेड्स शिल्लक आहेत. शिवनेरी कॉलेज मुलींचे वसतीगृह कोविड केअर सेंटर शिरुर अनंतपाळ येथे ६० बेड्स आहेत. ५८ रुग्ण भरती असून २ बेड्स शिल्लक आहेत. समाज कल्याण हॉस्टेल कव्हा रोड येथे २०० बेड्स आहेत १६२ रुग्ण भरती असून ३८ बेड्स शिल्लक आहेत.

विवेकानंद रुग्णालय लातूर येथे १०० बेड्स आहेत येथे ३५ रुग्ण भरती आहेत तर ६५ बेड्स शिल्लक आहेत. फुलाबाई बनसोडे हॉस्पिटल लातूर येथे १०० बेड्स असून ४६ रुग्ण भरती आहेत तर ५४ बेड्स शिल्लक आहेत. अल्फा सूपर स्पेशालिटी हॉस्पिटल लातूर येथे ५० बेड्स आहेत. ३१ रुग्ण भरती असून १९ बेड्स शिल्लक आहेत. एमआयएमएसआर मेडीकल कॉलेज लातूर येथे १०० बेड्स आहो. ४२ रुग्ण भरती असून ५८ बेड्स शिल्लक आहेत. लातूर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे ७५ बेड्स आहेत. येथे एकही रुग्ण भरती नसल्याने सर्व बेड्स शिल्लक आहेत.

लाईफ केअर हॉस्पिटल उदगीर येथे ६० बेड्स आहेत. १८ रुग्ण भरती असून ४२ बेड्स शिल्लक आहेत. सह्याद्री हॉस्पिटल लातूर येथे ५० बेड्स आहेत. १६ रुग्ण भरती असून ३४ बेड्स शिल्लक आहेत. गॅलॅक्सि हॉस्पिटल लातूर, आयकॉन हॉस्पिटल लातूर, गायत्री हॉस्पिटल लातूर या तिन्ही हॉस्पिटलमध्ये प्रत्येकी येथे ५० बेड्स आहेत. प्रत्येकी ९ रुग्ण भरती असून प्रत्येकी ४१ बेड्स शिल्लक आहेत तर मध्यवर्ती जिल्हा कारागृह लातूर येथे बेड्स उपलब्ध नाही.

गुरुजनांच्या हस्ते ५२ मोठी झाडे लावण्यात आली

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,436FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या