28.3 C
Latur
Friday, June 25, 2021
Homeलातूरलातूर जिल्ह्याला २४,९०० लस

लातूर जिल्ह्याला २४,९०० लस

एकमत ऑनलाईन

लातूर : लातूर जिल्ह्यात ज्या गतीने लसीकरण मोहीम सुरु झाली होती त्यात लसीच्या उपलब्धतेअभावी खंड पडला आहे. तरीही आरोग्य विभाग लस मिळविण्यासाठी प्रयत्नशील असल्यामुळेच दि. ५ मे रोजी लातूर जिल्ह्याला १८ ते ४५ वयोगटासाठी १२ हजार कोव्हॅक्सिन तर दुस-या डोससाठी १२ हजार ९०० कोव्हीशिल्ड लस, असे एकुण २४ हजार ९०० डोसेस उपलब्ध झाले असून आज दि. ६ मे पासून जिल्ह्यातील लसकरण केंद्रावर लसीकरण पुर्ववत सुरु होणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी दिली.

जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षा घेता राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पाकलकमंत्री यांच्या सूचनेनूसार जिल्ह्यात लसीकरण मोहीम जानेवारीमध्ये सुरु झाली. गेल्या पाच महिन्यांत लातूर जिल्ह्यात २ लाख १ हजार ४७० जणांनी पहिला डोस तर ३४ हजार ७९१ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. दोन्ही डोस मिळून २ लाख ३५ हजार १९० हून अधिक संख्या गेली आहे. लातूर जिल्ह्यात लसीकरण मोहीम जोरदारपणे सुरु असताना मागणी तसा पुरवठा होत नसल्यामुळे लसीकरण मोहीमेची गती मंदावली. दररोज थोड्या प्रमाणात लस उपलब्ध होत आहे. त्यात बुधवारी वाढ होऊन १८ ते ४५ वयोगटासाठी १२ हजार कोव्हॅक्सिन तर दुस-या डोससाठी १२ हजार ९०० कोव्हीशिल्ड लस, असे एकुण २४ हजार ९०० डोसेस उपलब्ध झाले. पहिल्या डोसनंतर ज्यांची दुस-या डोसची मुदत संपली आहे, अशांना उपलब्ध डोसमधून प्राधान्याने दूसरा डोस दिला जाणार आहे.

राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना जारी केल्या आहेत. त्या उपाययोजनांवर अंमलबजावणी करण्यावर लातूर जिल्ह्यातील नागरिकांनी भर दिलेला असल्यामुळे सरकारच्या मार्गदर्शक सूचनांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. परिणामी एप्रिलमध्ये कोरोना धावणा-या मिटरची गती मे महिन्यांत काही प्रमाणत कमी झाली आहे. ज्यांनी लसीचा पहिला डोस घेऊन मुदत संपली त्यांना प्राधान्याने दुसरा डोस देण्याचा विचार केला आहे. त्यामुळे संबंधीतांनी घाबरण्याचे काहींच कारण नाही. लस उपलब्ध होत आहेत. बुधवारी ब-यापैकी लस उपलब्ध झाल्या आहेत. पात्र लाभार्थी एकही लसीकरणापासून वंचित राहणार नाहीत, यासंबंधीची सर्व खबरदारी आरोग्य विभाागाच्या वतीने घेतली जात आहे.

लसीकरणाचे शहरातील नियोजन
> विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था येथे १८ ते ४४ साठी पहिल्या डोससाठी फक्त कोव्हीशिल्ड लस उलब्ध राहील.
> २०० लोकांचे ज्यांना ऑनलाईन अपॉइंटमेंट मिळाली आहे अशाच लोकांचे लसीकरण सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत होईल. औषधी भवन येथे १८ ते ४४ साठी पहिल्या डोससाठी फक्त कोव्हॅक्सिन लस उलब्ध राहील.

महानगरपालिकेचे मोफत लसीकरण केंद्र
> सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल
> मनपा आरोग्य केंद्र राजीव नगर
> मनपा रुग्णालय पटेल चौक
> कम्युनिटी हॉल
> कै. बब्रुवान काळे आयुर्वेदिक महाविद्यालय
> ममता हॉस्पिटल
> शिवपुजे हॉस्पिटल
> जटाळ हॉस्पिटल
> सुखदा हॉस्पिटल लेबर कॉलनी
> श्री व्यंकटेश हॉस्पिटल सुभेदार रामजीनगर
> वयोगट ४५ च्या पुढील नागरिकांसाठी पहिला व दुसरा डोस कोव्हीशिल्ड लसीचा उपलब्ध राहील सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत असेल.
> दुस-या डोससाठी प्राध्यान्य दिले जाईल.

किनगांव येथील तीन दुकाने आगीत जळून खाक

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
202FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या