23.7 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeलातूरउदगीर आगारातूून पंढरपूर वारीसाठी २५ जादा बसेस

उदगीर आगारातूून पंढरपूर वारीसाठी २५ जादा बसेस

एकमत ऑनलाईन

उदगीर : प्रतिनिधी
राज्यात प्रचंड राजकीय घडामोडी सुरू असताना महाराष्ट्रातील जनतेला पंढरपूरच्या वारीचे वेध लागले आहेत. दहा जुलै रोजी आषाढी एकादशीनिमित्त हजारो भाविक पंढरपूरला विठ्ठलाचे दर्शन घ्यायला जाण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे क्षेत्र पंढरपूरच्या दिशेने रवाना होणा-या वारक-यांसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळ एसटीच्या विशेष बसगाडया सोडण्यात येणार आहेत.

वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी आषाढी एकादशीला महाराष्ट्रसह शेजारील राज्यातील लाखो भाविक पंढरपूर येथे जातात. यात काही भाविक हरिनामाचा गजरात पायी दिंडी आळंदी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोबत तर काही भाविक देहू येथून संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोबत पंढरपूरकडे मार्गस्थ झाले आहेत. याशिवाय राज्यातल्या विविध भागातून संताच्या पालख्या पंढरपूरकडे आषाढी वारीसाठी निघालेल्या आहेत. पायी वारी न करू शकणा-या वारक-यांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या उदगीर आगाराकडून आषाढी यात्रेसाठी जाणा-या वारक-यांसाठी २५ बस सोडण्याचे नियोजन केले आहे. गेली दोन वर्षे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आषाढी निमित्त पंढरपूर कडे रवाना होणा-सा पालख्यांचा सोहळा साधेपणाने करण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या होत्या.

दोन वर्षानंतर यंदा वारी सोहळा होणार आहे. यामध्ये एसटीच्या प्रवासी वाहतुकीला अनन्य साधारण महत्व आहे. यंदा पाईवारी निघाल्याने एसटीने पंढरपूरला जाणारे भक्तगण वाढणार आहेत. गेल्या वर्षी शिवशाही बसने संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका पंढरपूरला नेण्यात आल्या होत्या. दोन वर्षापर्यंत भाविकांना वारीत जाता आले नाही. त्यामुळे हिरमोड झाला होता. भाविकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या