लातूर : शहरात काहीं दिवसांपासून मोबाईल चोरीचे प्रमाण वाढले होते. यात मोबाईल चोरटे शोधण्यात येथील शिवाजीनगर पोलिसांना यश आले आहे. यात चौघांकेडून २५ मोबाईल व चोरलेली एक दुचाकी असा एकुण ४ लाख २ हजार ८०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. यात दोन अल्पवयीन मुले असून, त्यांना नोटीस देऊन सोडून देण्यात आले आहे, तर दोघांना अटक करण्यात आली.
येथील शिवाजीनगर पोलिस ठाणयात गेल्या महिन्यात ५९ हजार रुपये किंमतीचा एक मोबाईल चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नानासाहेब लाकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश घाडगे हे करीत होते. यात त्यांना सायबर कक्षाचीही मदत मिळाली. सुरुवातीला हा मोबाईल जयभीमनगर येथील बाबासाहेब वाघमारे याच्याकडे असल्याची माहिती घाडगे यांना मिळाली. त्यांनी तातडीने त्याला अटक केली.
त्याची अधिक चौकशी केली असता, त्याने म्हाडा कॉलनीतील सूरज उर्फ मधूकर मोरे याच्याकडून घेतल्याचे तपासात निषप्प झाले. घाडगे यांनी या सूरजला अटक केली. दोन अल्पवयीन मुलांच्या सहाय्याने सूरजने शहरातील अनेक ठिकाणी मोबाईल चोरी केल्याचे तपासात पुढे आले. यात पोलिसांनी अधिक तपास करुन २५ मोबाईल व चोरलेली दुचाकी असा एकुण ४ लाख २ जार ८०० रुपयांचा माल जप्त केला.
यातील चोरट्यांनी मार्चमध्ये येीिल महात्मा बसवेश्वर चौकातून एक दुचाकी चोरली. त्यावर खोटीच नंबर प्लेटही टाकली. मोबाईल चोरताना याच दुचाकीचा ते सातत्याने वापर करीत असल्याची माहिती तपासात समोर आल्याचे घाडगे यांनी सांगीतले. यात सूरज हा दोन अल्पवयीन मुलांच्या सह्यााने मोबाईल चोरुन आणत. त्यानंतर तो बाबासाहेब वाघमारे याला चोरलेले मोबाईल देत. चोरलेले मोबाईल विक्रीची जबाबदारी ही वाघमारे याच्यावर असायची. यात सूरजला दोन ते चार हजार रुपयांपर्यंत पैसे दिले जात होते.
यात मोबाईल विकताना पावतीऐवजी आपल्या आधारकार्डवर हा मोबाईल माझाच आहे, असे लिहून तो विकला जात असल्याचेही तपासात पुढे आले आहे. ज्यांनी ज्यांनी हे चोरीचे मोबाईल विकत घेतले त्यांच्याकडून हे मोबाईल जप्त करण्यात आले असल्याची माहिती घाडगे यांनी दिली.
महावितरण विरोधात आंदोलन छेडण्याचा मनसेचा इशारा