25.4 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeलातूरलातूर जिल्ह्यासाठी २५ व्हेंटीलेटर उपलब्ध

लातूर जिल्ह्यासाठी २५ व्हेंटीलेटर उपलब्ध

एकमत ऑनलाईन

चाकूर : लातूर जिल्ह्यात व शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना रुग्णांना वैद्यकीय सुविधा मिळणे आवश्यक असून कोरोना रुग्णांना आवश्यक असलेल्या ५० व्हेंटीलेटरची मागणी खासदार सुधाकर श्रृंगारे यांनी केंद्रीय आरोग्यमंञ्याकडे पञाव्दारे व फोनव्दारे केली होती. त्यांच्या प्रयत्नास व पाठपुराव्यास यश मिळाले असून लातूर जिल्ह्यासाठी २५ व्हेंटीलेटर पंतप्रधान सहायत्ता निधीतून उपलब्ध झाल्याची माहिती विलासराव देशमुख वैद्यकीय विज्ञान संस्थेचे अधीष्ठाता एस बी देशमुख यांनी दिली आहे.

खासदार सुधाकर श्रृंगारे यांनी ९ एप्रिल रोजी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांच्याकडे ५० व्हेंटीलेटर व १० हजार रेमडेसिवीर या इंजेक्शनची मागणी पत्राद्वारे केली होती.त्यानंतर फोनवरुनही थेट संवाद साधला होता. त्या पार्श्वभूमीवर २६ एप्रिल रोजी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास २५ व्हेंटीलेटर उपलब्ध झाले असून ते सुपर स्पेशालिटी हाँस्पिटल १५, आयसीयू वार्ड २ मध्ये ३, आयसीयू वार्ड ३ मध्ये ३, एमआयसीयु वार्ड २, सारी वार्डात २ असे एकूण २५ व्हेंटीलेटर वापरात असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. तर उर्वरीत २५ व्हेंटीलेटर व रेमडेसीविर लवकरच उपलब्ध होतील असा विश्वास खा.सुधाकर श्रृंगारे यांनी व्यक्त केला आहे.

समन्सविरोधात रश्मी शुक्ला उच्च न्यायालयात

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या