30.9 C
Latur
Monday, May 10, 2021
Homeलातूरलातूर जिल्ह्यात २५०१ बेड शिल्लक

लातूर जिल्ह्यात २५०१ बेड शिल्लक

एकमत ऑनलाईन

लातूर : लातूर जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठीच्या उपाययोजना करण्याबरोबरच कोरोनाबाधित रुग्णांना चांगले उपचार मिळावेत, ते उपचाराने लवकरात लवकर बरे होऊन घरी जावेत, यासाठीही जिल्हा प्रशासन व जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील विविध ५५ संस्थांमधून ५६३० बेड उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. त्यापैकी ३०६५ बेडवर रुग्ण दाखल असून अद्यापही जिल्ह्यात २५०१ बेड शिल्लक असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांच्या कोरोनाच्या दैनंदिन अहवालाद्वारे देण्यात आली आहे.

कोरोनाबाधित रुग्णांना बेड मिळत नाही. त्यामुळे ‘कोणी बेड देता का बेड’, अशी आवई उठविण्यात आली आहे. परंतू, खरी परिस्थिती वेगळीच आहे. जिल्ह्यात अद्यापती २५०१ बेड शिल्लक आहेत. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये १५० पैकी ४३ बेड शिल्लक आहेत. सामान्य रुग्णालय उदगीर येथे १०० पैकी ३, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल लातूर येथे २०० पैकी ३२, अरुणा अभय औसवाल अंध विद्यालय उदगीर येथे ६९ पैकी ४४, जयहिंद सैनिक शाळा कोविड केअर सेंटर उदगीर येथे १५० पैकी १२६, डॉ. बाबासाहेब आंबेडकर बौद्ध निवासी शाळा कोविड केअर सेंटर तोंडार पाटी उदगीर येथे १८० बेड पैकी ५९, १००० मुला व मुलींचे वसतीगृह १२ नंबर पाटी लातूर येथे ७५० पैकी १७०, मुलांची शासकीय निवासी शाळा मरशिवणी ता. अहमदपूर १५० पैकी ११६, मुलांची शासकीय निवासी शाळा, औसा येथे २०० पैकी १०५, कोविड केअर सेंटर दापका ता. निलंगा येथे १०० पैकी ६८, शासकीय वसतीगृह न्यू बिल्डींग देवणी येथे ७७ पैकी ६०, कृषी पी. जी. कॉलेज चाकुर येथे १५० पैकी ६०, मुलींची शासकीय निवासी शाळा बावची ता. रेणापूर येथे १०८ पैकी ५५, पूरणमल लाहोटी तंत्रनिकेतन महाविद्यालय लातूर ५०० पैकी १३२, शासकीय आय. टी. आय. कॉलेज जळकोट येथे १०० पैकी ४७, समाज कल्याण मुलींचे वसतीगृह जळकोट येथे १०० पैकी ८३, समाज कल्याण हॉस्टेल कव्हा रोड लातूर येथे २५० पैकी ४१, विवेकानंद हॉस्पिटल लातूर येथे ६५ पैकी ६२, फुलाबाई बनसोडे हॉस्पिटल लातूर येथे ८० बेडपैकी ३० बेड शिल्लक आहेत.

एमआयएमएसआर मेडीकल कॉलेज लातूर येथे ३५६ बेडपैकी २७३ बेड शिल्लक आहेत. लातूर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल लातूर येथे १०० पैकी ८५, लाईफ केअर हॉस्पिटल उदगीर येथे ९० पैकी ४२, गॅलेक्सी हॉस्पिटल लातूर येथे २८ पैकी १, आयकॉन हॉस्पिटल लातूर येथे ५० पैकी ११, गायत्री हॉस्पिटल लातूर येथे ४० पैकी २०, स्पर्श हॉस्पिटल लातूर १५ पैकी ५, स्पंदन हॉस्पिटल लातूर २४ पैकी २, शकुंतला इंटीग्रेटेड कोविड केअर सेंटर चाकुर ३२ पैकी १७, अमृत हॉस्पिटल उदगीर २० पैकी १, अश्विनी हॉस्पिटल लातूर ३० पैकी २०, न्यु विश्वकृपा हॉस्पिटल उदगीर येथे ३९ बेड पैकी १९ बेड शिल्लक आहेत.

या हॉस्पिटलमध्ये बेड शिल्लक नाहीत
उप जिल्हा रुग्णालय निलंगा येथे ५० पैकी ५८ भरती, मुलांचे शासकीय वसतीगृह जाऊ ता. निलंगा येथे १०० पैकी १००, सामाजिक न्याय भवन लामजना, बिडवे अभियांत्रिकी मुलींचे वसतीगृह मनपा लातूर ४०० पैकी ४००, संभाजी केंद्रे महाविद्यालय जळकोट ७० पैकी ७०, शिवनेरी कॉलेज मुलींचे वसतीगृह कोविड केअर सेंटर शिरुर अनंतपाळ ७० पैकी ७०,अल्फा हॉस्पिटल लातूर येथे ५२ पैकी ५२, सह्याद्री हॉस्पिटल लातूर येथे ५० पैकी ५०, मध्यवर्ती जिल्हा कारागृह लातूर १० पैकी १०, मोरे हॉस्पिटल मुरुड २० पैकी २०, नोबेल हॉस्पिटल लातूर ६० पैकी ६०, व्हीजन हॉस्पिटल लातूर ३५ पैकी ३५, प्रभावती हॉस्पिटल लातूर ४५ पैकी ४५, चवंडा हॉस्पिटल लातूर १९ पैकी १९, सनराईज हॉस्पिटल लातूर १४ पैकी १४, पाटील हॉस्पिटल लातूर २० पैकी २०, तिरुपती हॉस्पिटल लातूर २५ पैकी २५, मुरुड हेल्थ केअर सेंटर मुरुड २६ पैकी २६, युनिक हॉस्पिटल लातूर ३० पैकी ३०, गांधी हॉस्पिटल १४ पैकी १४, साई क्रीटीकल हॉस्पिटल लातूर १५ पैकी १५, न्यु लाईफ हार्ट अ‍ॅण्ड क्रीटीकल केअर हॉस्पिटल लातूर १५ पैकी १५, पामा सिटी केअर हॉस्पिटल उदगीर १७ पैकी १७, स्पंदन हॉस्पिटल उदगीर येथे २० बेड पैकी २० बेडवर रुग्ण भरती आहेत.

दुसरी लस घेऊनही १५ पोलिस बाधित; २५७४ पोलिसांनी घेतला पहिला डोस

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
184FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या