23.4 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeलातूरशेवटच्या दिवशी २७ हरकती दाखल

शेवटच्या दिवशी २७ हरकती दाखल

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
लातूर शहर महानगरपालिका क्षेत्रातील प्रभागांची संख्या व त्यांची व्याप्ती महानगरपालिका आयुक्त अमन मित्तल यांन जाहीर केली. त्यावर दि. २४ जूनपर्यंत हरकती मागविण्यात आलेल्या होत्या. हरकती नोंदविण्याच्या शेवटच्या दिवशी अक्षरश: हरकतींचा पाऊसच पडला. एकाच दिवसात तब्बल २७ हरकती नोंदविल्या गेल्या. आतापर्यंत एकुण ३५ हरकतींची नोंद झाली असून त्यावर दि. ५ जुलैपर्यंत सूनावणी होणार आहे.

लातूर शहर महानगरपालिका क्षेत्रातील प्रभागांची संख्या व त्याची व्याप्ती (प्रभागाच्या सीमा) प्रकल्प नकाशा दि. १३ जून रोजी महानगरपालिका आयुक्त अमन मित्तल यांनी जाहीर केला. शहरात एकुण २७ प्रभाग दर्शविण्यात आले आहेत. १ ते २७ प्रभागांचे क्रमांक कोणत्या क्रमांकाच्या प्रभागात कोणती गल्ली, रस्ता, येतो त्याची नावे, प्रभागाच्या सीमा स्पष्ट होतील, असा नकाशा, त्या त्या प्रभागातील लोकसंख्या आदी बाबतचा मसुदा व नकाशा प्रसिद्ध केला आह. या अधिसूचनेच्या अनुषंगाने हरकती किंवा सूचना असल्यास लातूर शहर महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे दि. २४ जूनपर्यंत लेखी सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार हरकती नोंदविण्यात आलेल्या आहेत. दि. २३ जूनपर्यंत केवळ ८ हरकतींची नोंद झाली होती. परंतू शेवटच्या दिवशी तब्बल २७ हरकतींची भर पडल्याने आता एकुण ३५ हरकती नोंदविल्या गेल्या आहेत, अशी माहिती महानगरपालिकेच्या उपायुक्त मयुरा शिंदेकर यांनी दिली.

प्राप्त हरकतींवर दि. ५ जुलैपर्यंत सुनावणी होणार आहे. लातूर महानगरपालिकेच्या नव्या रचनेमध्ये एकुण २७ प्रभाग आहेत. प्रत्येक प्रभागात तीन सदस्य राहणार आहेत. त्यामुळे आता सदस्य संख्या ८१ वर जाणार आहे. नव्या प्रभाग रचनेत सरासरी १४ हजार मतदार आहेत. महापालिका हद्दीत एकुण ३ लाख ८२ हजार ९४० लोकसंख्या आहे. त्यापैकी अनुसूचित जातीची ६७ हजार ४७४ तर अनुसूचित जमातीची ५ हजार ५५० इतकी लोकसंख्या आहे. कमाल १५ तर किमान १२ हजार मतदार प्रत्येक प्रभागात आहेत. यानूसार ही रचना करण्यात आली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या