25 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeलातूर१४२ प्रकल्पांत २९.४ टक्के उपयुक्त पाणीसाठा

१४२ प्रकल्पांत २९.४ टक्के उपयुक्त पाणीसाठा

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यात गतवर्षी चांगला पाऊस पडल्याने जिल्ह्यातील सर्वच प्रकल्पांत सद्य:स्थितीही ब-यापैकी पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील दोन मोठे, आठ मध्यम, १२८ लघू व ४ समन्वय लघू प्रकल्प असे एकुण १४२ प्रकल्पांत २९.७४ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. दोन-तीन दिवसांत मान्सूनचे आगमन होईल. यंदा ब-यापैकी पाऊस असल्याचा अंदाज हवामान विभागाचा असल्यामुळे जिल्ह्यातील सर्वच प्रकल्प शंभर टक्के भरतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

लातूर, उस्मानाबाद व बीड या तीन्ही जिल्ह्यासाठी अतिश्य महत्वपुर्ण असलेल्या केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा या मोठ्या प्रकल्पाचा प्रकल्पीय उपयुक्त पाणीसाठा १७६.९६३ दलघमी एवढा आहे. सध्या या प्रकल्पात ११०.४३६ दलघमी म्हणजेच ३५.७७ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. लोहारा तालुक्यातील निम्न तेरणा या मोठ्या प्रकल्पाचा प्रकल्पीय उपयुक्त पाणीसाठा ९१.२२१ दलघमी आहे. या प्रकल्पात ८०.५८८ दलघमी पाणीसाठा असून उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी ५५.४९ एवढी आहे.

जिल्ह्यातील तावरजा, व्हटी, रेणापूर, तिरु, देवर्जन, साकोळ, घरणी व मसलगा या आठ मध्यम प्रकल्पांची प्रकल्पीय क्षमता १२२.१५६ दलदधमी असून सध्या या आठ प्रकल्पांमध्ये ५७.५७५ दलधमी एवढा पाणीसाठा आहे. या प्रकल्पांतील उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी २६.७० एवढी आहे. १२८ लघू प्रकल्पांची प्रकल्पीय क्षमता २९६.८२१ दलघमी आहे. सध्या या प्रकल्पांत ९२.२८६ दलघमी पाणीसाठा आहे. उपयुक्त पाण्याची टक्केवारी १९.८८ इतकी आहे. ४ समन्वय लघू प्रकल्पांची प्रकल्पीय क्षमता ८.३७२ दलघमी आहे. सध्या या ४ प्रकल्पांत २.१५२ दलघमी पाणी असून त्याची टक्केवारी १५.०६ एवढी आहे. जिल्ह्यातील एकुण १४२ प्रकल्पांची प्रकल्पीय क्षमता ६९५.५३३ दलघमी आहे. या प्रकल्पांमध्ये सद्यस्थितीत ३४३.०३७ दलघमी पााणीसाठा असून त्याची टक्केवारी २९.७४ टक्के एवढी आहे.

सद्यस्थितीत जिल्ह्यातील एकही प्रकल्पांत १०० टक्के पाणीसाठा नाही तर ७५ टक्केपेक्षाही जास्त पाणीसाठा नाही. ७ प्रकल्पांत ५१ ते ७५ टक्के, २९ प्रकल्पांत २५ ते ५० टक्के, ८३ प्रकल्पांत २५ टक्क्यांच्या खाली पाणीसाठा आहे तर २३ प्रकल्प जोत्याखाली आहेत. तावरजा प्रकल्पात २४.२५ टक्के, मसलगा प्रकल्पात ४०.६६ टक्के, व्हटी प्रकल्पात १७.०७ टक्के, रेणापूर प्रकल्पात ४४.५५ टक्के, तिरु प्रकल्पात ११.३१ टक्के, देवर्जन प्रकल्पात २.४.४२ टक्के, साकोळी प्रकल्पात १६.६० टक्के, तर घरणी प्रकल्पात २४.१८ टक्के पाणीसाठा आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या