24.4 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeलातूरबडतर्फ केलेले २९७ एसटी कर्मचारी कामावर

बडतर्फ केलेले २९७ एसटी कर्मचारी कामावर

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
जिल्ह्यातील पाच आगारांतील ३०१ एसटी कर्मचारी संप काळात बडतर्फ केले होते. यातील २९७ कर्मचा-यांना अपिल करण्याची संधी देऊन त्यांना कामावर घेण्यात आले. उर्वरीत चार कर्मचा-यांना अपिल करण्याची संधी न मिळाल्याने त्यांची एसटीतील नोकरी अडचणीत आली आहे.

एसटीच्या संपात सहभागी असलेले सर्व एसटी कर्मचारी, कामगार कामावर आल्याने एसटीला पुर्वीसारखे वैभव प्राप्त झाले आहे. सध्या जिल्ह्यातील एसटी महामंडळाच्या बसेस दररोज धावत असून २१०० फे -या होत आहेत. बसेस दररोज एक लाख ५८ हजार किलो मीटर धावत असून रोज ५७ लाख रुपयांचे उत्पन्न होत आहे. हे उत्पन्न ६० ते ६१ लाख रुपयांपर्यंत नेण्यासाठी एसटी महामंडळाचे प्रयत्न आहेत.

गेल्या पाच, सहा दिवसांपासून रोज ५७ लाख रुपये उत्पन्न मिळत आहे. एसटी कर्मचारी, कामगारांच्या संपामुळे गेल्या सहा महिन्यांपासून एसटीला लागलेली घरघर थांबली असून आता परिस्थिती पुर्वपदावर येत आहे. बडतर्फ केलेले २९७ कर्मचारी सर्व सोपस्कार पूर्ण करुन कामावर आल्याने बस वाहतुकीचा वेग वाढला आहे. आता जिल्हा व जिल्ह्याबाहेर बसेसच्या फे-या वाढल्या आहेत. आणखी बसेस वाढविण्याचा प्रयत्न एसटी महामंडळाकडून केला जात आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या