24.6 C
Latur
Sunday, October 24, 2021
Homeलातूरनिलंग्यात ३ दिवस जनता कर्फ्यू

निलंग्यात ३ दिवस जनता कर्फ्यू

एकमत ऑनलाईन

निलंगा : निलंगा तालुक्यातील मदनसुरी येथील एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तो व्यक्ती निलंगा शहरात दि. १६ व १८ जून रोजी निलंगा येथील खाजगी दवाखान्यात उपचार करण्याकरिता आला व दिवसभर शहरात फिरला असल्याने निलंगा शहरात तीन दिवस अत्यावश्यक सेवा वगळता कडकडीत बंद पाळण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे यांनी दिली.

तालुक्यातील मदनसुरी येथील एका व्यक्तीचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला असून, संबंधित व्यक्ती निलंगा शहरातील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी आल्याने डॉक्टर व कम्पाऊंडर यांना क्वारंन्टाईन करण्यात आले आहे. मात्र संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाल्यामुळे तो निलंगा शहरात कोठे फिरला व कोणाच्या संपर्कात आला, याची माहिती मिळत नसल्यामुळे तसेच त्यांनी प्रवासी वाहन टमटमने प्रवास केला आहे. त्याचीही माहिती मिळत नसल्यामुळे गंभीर परिस्थिती शहरात निर्माण होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे निलंगा शहर कोरोनाच्या प्रसारापासून दूर ठेवण्याकरिता निलंगा शहर स्तरावर नगर परिषद प्रमुख म्हणून दि. २० ते २२ जून दरम्यान तीन दिवस निलंगा शहरात कडेकोट जनता कर्फ्यू असणार आहे. या दरम्यान पाणी, दुध, दवाखाना, मेडीकल या अत्यावश्यक सेवा चालू राहणार आहेत. याकरिता नागरिकांनी शहरात विनाकारण रस्त्यावर फिरू नये, मास्क न वापरणा-यांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष शिंगाडे यांनी सांगितले. या तीन दिवसात अत्यावश्यक सेवेकरिता ९६६५०२७७६६ या नंबरवर संपर्क साधावा, असे ते म्हणाले.

मदनसुरी गाव १४ दिवस बंद
निलंगा तालुक्यातील मदनसुरी येथील एका ६५ वर्षीय व्यक्तीचा दि. १९ जून रोजी दुपारी कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे मृत्यू झाल्याने प्रशासनाच्या वतीने मदनसुरी हे गाव १४ दिवसांसाठो पूर्णत: सील करण्यात आले आहे. तहसीलदार गणेश जाधव, गटविकास अधिकारी अमोल ताकभाते, तालुका आरोग्य अधिकारी श्रीनिवास कदम, कासारसिरसी येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक रेवनाथ ढमाळे, मदनसुरी बिट हवालदार ज्ञानोबा सिरसाट, पो. शिवाजी केंद्रे यांनी गावात भेट देऊन विविध उपाययोजना व खबरदारी म्हणून संपूर्ण गाव बंद करण्याच्या सूचना दिल्यामुळे मदनसुरी गाव १४ दिवसांसाठी बंद असणार आहे. यामुळे गावात निर्मनुष्यता जाणवत होती. पोलिसांचा कडक पहारा मदनसुरीत आहे. आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी ताई व आरोग्य अधिकारी गावात घरोघरी जाऊन तपासणी करीत असून, गावात सर्वत्र फवारणी करण्यात येते आहे, अशी माहिती शिवाजी माने यांनी दिली.

Read More  भामटे गजाआड : सैन्य भरतीच्या नावाखाली शेकडो तरुणांची फसवणुक

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या