23.3 C
Latur
Saturday, August 8, 2020
Home लातूर ३ लाख ६० हजार शेतक-यांनी भरला ३२ कोटींचा पीकविमा

३ लाख ६० हजार शेतक-यांनी भरला ३२ कोटींचा पीकविमा

लातूर : पंतप्रधान पिक विमा योजेने अंतर्गत दि. ३१ जुलैपर्यंत लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जिल्ह्यातील १२० शाखांमधून फिजिकल डिस्टनसचे पालन करीत जिल्ह्यातील ३ लाख ५९ हजार ५३३ शेतक-यांनी तब्बल ३२ कोटी ४ लाख ५५ हजार रुपयांचा पीक विमा हप्ता गावातील स्थानिक सोसायट्यामार्फत ३१ जुलैपर्यंत बँकेत भरना केला.

देशातील कोविड-१९ ची गंभीर परिस्थिती पाहता शेतक-यांना बँकेत येण्यासाठी त्रास होवू नये यासाठी राज्याचे माजी मंत्री सहकारी महर्षि तथा बँकेचे मार्गदर्शक दिलीपराव देशमुख यांच्या सुचनेनुसार लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने थेट शेतक-यांच्या गावात जाऊन पीक विमा स्विकारला. यामुळे जिल्ह्यातील शेतक-यांना मोठा दिलासा जिल्हा बँकेमुळे मिळाला आहे, असे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन अ‍ॅड. श्रीपतराव काकडे म्हणाले.

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १२० शाखांत संचालक मंडळाच्या निर्देशानुसार पीक विमा हप्ता भरुन घेण्यासाठी बँक प्रशासनाने मोठ्या प्रमाणात जादा अधिकारी व बँक कर्मचा-यांची सर्व शाखांत नियुक्ति करुन शेतक-यांचा पिक विमा हप्ता विना तक्रार मुदतीत भरुन घेण्यासाठी गेली १५ दिवसांपासून अथक प्रयत्न केले. तसेच ग्रामीण भागातील प्रत्येक गावात सोसायटीचे चेअरमन व गटसचिव गावातील शेतक-यांचा पिक विमा फिजिकल डिस्टनसचे पालन करीत भरुन घेतलेला आहे, अशी माहिती अ‍ॅड. काकडे यांनी दिली.

अ. क. तालुका  प्रस्ताव संख्या विमा हप्ता रक्कम
1. लातूर ५१ हजार ६०८ ४,९१,९२०००
2. रेणापूर २४ हजार ८१८ २,१८,७५०००
3. औसा ६० हजार ६८३ ४,८५,५२०००
4. निलंगा ५६ हजार १९३ ४,४०,२५०००
5. उदगीर ३० हजार ४१४ ३,१७,१८०००
6. अहमदपूर ३४ हजार ३०८ ३,९७,४००००
7. चाकुर ४५ हजार १९२ ३,८५,१००००
8. शिरुर अनंतपाळ २१ हजार १०४ १,७६,२४०००
9. देवणी २० हजार ३५१ १,७५,८१०००
10. जळकोट १४ हजार ८६२ १,१६,३८०००

एकुण- प्रस्ताव: ३,५९,५३३.
एकुण- पीकविमा भरला: ३२,०४,५५०००

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,136FansLike
92FollowersFollow