22.4 C
Latur
Saturday, June 19, 2021
Homeलातूरनिलंगेकरांच्या पुढाकारातून ऑक्सीजनसह ३० बेड

निलंगेकरांच्या पुढाकारातून ऑक्सीजनसह ३० बेड

एकमत ऑनलाईन

निलंगा : येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल रुग्णांना ऑक्सिजनची जाणवत असलेली कमतरता दुर करण्यासाठी कॉग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर यांच्या पुढाकाराने बाजार समिती व आडत व्यापा-यांच्या वतीने ३ लाख रुपये खर्च करून जवळपास ३० बेडला ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी आवश्यक बाबींंची पूर्तता करण्यात आली. त्याचा लोकार्पण सोहळा दि १२ मे रोजी निलंगेकर यांच्या हस्ते झाला.

निलंगा उपजिल्हा रुग्णालयात केवळ ५० बेडच्या डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलची मंजुरी असतानाही या ठिकाणी दैनंदिन १०० ते १२० रुग्ण उपचार घेत आहेत. रुग्णसंख्या अधिक असल्याने प्रत्येक रुग्णांना ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यासाठी रुग्णालय प्रशासनाची दमछाक होत होती. ही बाब कॉग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर यांना उपजिल्हा रुग्णालयातील भेटीदरम्यान लक्षात आल्याने याबाबत त्यांनी पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्याकडेही सोयिधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली.

एवढ्यावरच ते न थांबता त्यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ दिलीप सौंदाळे यांच्याशी चर्चा करून एका वार्डातील ३० बेडला एकाच वेळी ऑक्सिजन पुरवठा कशा पद्धतीने करता येईल याचा आराखडा तयार करून त्या कामासाठी लागणारा ३ लाख रुपयांचा निधी स्वत पुढाकार घेऊन सचिव संतोष पाटील, हारी सातपुते व आडत व्यापारी अनिल अग्रवाल, दत्ता कोरले, बालाजी उसनाळे, रवींद्र अग्रवाल, विक्रम कठवते,अमर आर्य, अतुल चव्हाण, बाळू बाहेती, शिवकुमार निला, वारद आप्पा तळिखेडकर, माधव गाडीवान निलंगा बाजार समितीचे सर्व व्यापा-यानी मिळून त्यात निलंगेकर यांनी स्वत: मोठा भार उचलत ३० बेडला ऑक्सिजन सेंटर लाईन, ओटू, इनलेट, आऊटलेट आदी बाबी युध्द पातळीवर उपलब्ध करून दिल्या.

त्या कामाचे लोकार्पण होऊन निलंगा उपजिल्हा रुग्णालयात ३० ऑक्सिजन बेडची भर पडली आता जवळपास १०० च्या वर ऑक्सिजन बेडची संख्या गेल्याने आता रुग्णांचे प्राण वाचवण्यिासाठी मोठे सहकार्य होणार आहे. यावेळी तहसीलदार गणेश जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेशकुमार कोल्हे, वैद्यकीय अधीक्षक डॉ दिलीप सौंदाळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ श्रीनिवास कदम, नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, सचिव संतोष पाटील , व्यापारी अनिल अग्रवाल, बालाजी उसनाळे, डॉ.सोळुंके, डॉ. हुगे, डॉ. गिते, डॉ. मदने, डॉ, श्रीमती बंडगर ,डॉ. श्रीमती काळे, ईरफान शेख, रामदास सोमवंशी अदी उपस्थित होते

सास-यांचे निधन होऊनही लसीकरण सेवा ठेवली सुरू

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या