27.8 C
Latur
Thursday, October 21, 2021
Homeलातूरएकुर्का (खुर्द) येथील ३३० जण 'होम क्वारंटाईन'

एकुर्का (खुर्द) येथील ३३० जण ‘होम क्वारंटाईन’

एकमत ऑनलाईन

जळकोट : जळकोट तालुक्यातील गव्हाण येथे दोन जणांना कोरोनाची लागण झाली होती़ त्यानंतर उपचार झाल्यानंतर हे दोघे जण घरी परतले होते़ त्यामुळे जळकोट तालुका कोरणामुक्त होता परंतु आता जळकोट तालुक्यातील एकुर्का खुर्द येथे ६५ वर्षीय महिलेस कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे़ कोरोनाचा अहवाल येण्यापूर्वीच या महिलेचा मृत्यू झाला होता़ त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आरोग्य विभाग आता अधिक सतर्क झाला असून या गावातील साठ घरे व यामधील ३३० लोकांना होम क्वारंटाईन केले आहे. तसेच साठ घरांचा परिसरदेखील सील करण्यात आला आहे.

जळकोट तालुक्यातील एकुर्का येथील एका ६५ वर्षीय महिलेला ़िद़१३ जूनपासून सर्दी खोकल्याचा त्रास होत होता यानंतर दि १७ जून रोजी या महिलेस उदगीरच्या कोवीड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले़ येथील वैद्यकीय अधिकाºयांना संशय आल्यानंतर या महिलेचा दुपारी चार वाजता स्वॅब घेण्यात आला़ स्वॅप घेतल्यानंतर उपचार सुरू असताना दि़ १८ रोजी पहाटे अडीच वाजता या महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर या महिलेचा मृतदेह कोरणा बॅगमध्ये पॅक करून नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आला. दि़ १८ रोजी या महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी घरातील काही मंडळी तसेच पाहुणे मंडळी उपस्थित होती.

यानंतर सदरील महिलेचा कोरोना पॉझिटीव्ह रिपोर्ट आला, त्यानंतर मात्र गावात एकच खळबळ उडाली, संबंधित गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले़ दि़ १९ जून रोजी जळकोटचे वैद्यकीय पथक संबंधित गावात पोहोचले व खबरदारीचा उपाय म्हणून साठ घरांतील ३३० नागरिकांना होम क्वारन्टाईन करण्यात आले़ या व्यक्तींनी १४ दिवस कुठल्याही परिस्थितीत घराच्या बाहेर पडू नये असे आदेश देण्यात आले आहेत. या गावातील साठ घरे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.
तसेच या महिलेच्या अंत्यविधीसाठी उपस्थित असणाºया काही जणांचेही स्वॅब घेण्यात आले आहेत तसेच घरातील १८ व्यक्तींचेदेखील स्वॅब घेण्यात आले आहे, जळकोट तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रशांत कापसे तसेच आतनूरचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुळे हे गावातील परिस्थतीवर लक्ष ठेवून आहेत. तसेच याठिकाणी पोलिस निरीक्षक गणेश
सोंडारे व पोलिस उपनिरीक्षक बोईनवाड हे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत तसेच प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये हे पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Read More  पीपीई किट परिधान करून पॉझिटिव्ह आमदार मतदान करण्यासाठी हजर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या