24.3 C
Latur
Thursday, June 24, 2021
Homeलातूरलातूर जिल्ह्यात ३३० नवे रुग्ण, १२ मृत्यू

लातूर जिल्ह्यात ३३० नवे रुग्ण, १२ मृत्यू

एकमत ऑनलाईन

लातूर : जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असून, रविवार दि. २० सप्टेंबर रोजी आणखी ३३० नव्या रुग्णांची भर पडली आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या १४ हजार ३८९ एवढी झाली आहे. त्यातच आणखी १२ बाधितांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ४२५ वर गेला आहे.

जिल्ह्यात सातत्याने रुग्णसंख्या वाढत असून, मृतांच्या संख्येतही वाढ होत आहे. आज त्यातही भर पडत १२ रुग्ण दगावले असल्याने मृतांची संख्या ४२५ वर जाऊन ठेपली आहे. दरम्यान, आज २७२ रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.

काल एकूण ३८९ जणांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या असून, यापैकी १३४ रुग्ण बाधित आढळून आले, तर ७९९ रॅपिड अँटिजन चाचण्यांपैकी १९६ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असल्याने आरटीपीसीआर आणि रॅपिड अँटिजन चाचण्या असे दोन्ही मिळून एकूण ३३० नव्या रुग्णांची भर पडली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात ३३३६ बाधित रुग्ण उपचार घेत आहेत.

मराठा समाजाला आरक्षण द्या: महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्यभर आंदोलन करणार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
202FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या