शिरूर अनंतपाळ : माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या संकल्पनेतून अक्का फौउंडेशन ‘ चे एक पाऊल दृष्टी एक पाऊल नेत्र आरोग्यासाठी या मोफत नेत्र तपासणी, चष्मेवाटप व मोतींिबदू शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात येत असून या ‘दृष्टी अभियान’ अंतर्गंत शिरूर अनंतपाळ शहरात नेत्र तपासणी शिबीर घेण्यात आले असून यात ३४० जणांची तपासणी करण्यात येऊन ३६ जणांना मोतींिबदु ऑपरेशन पाठविण्यात आले आहे.
या प्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष मंगेश पाटील, शहराध्यक्ष अॅड.गणेश सलगरे, नगराध्यक्षा मायावती धुमाळे, उपनगराध्यक्षा सुषमा मठपती,जेष्ठ नेते अॅड. संभाजीराव पाटील, धोंडीराम सांगवे, उमाकांत देवंगरे, गणेश धुमाळे, शंकर बेंबळगे, सिद्धलींग शिवणे, वीरभद्र मुदाळे, संदीप बिराजदार,ओम बर्गे, रतन शिवणे, दत्ता शिंदे, शामल शिंदे, डॉ.यासीन मुजेवार, विरेश सुगावे, सुमित दुरुगकर, माधव अब्दुलपुरे, मुख्तार देशमुख, विशाल गायकवाड,जनक पौळकर, ओमकार बिराजदार, सत्यम डिगोळे हे उपस्थित होते.दरम्यान माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांचा वाढदिवस ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १७ सप्टेंबर वाढदिवसापर्यंत अक्का फौउंडेशन निलंगा व उदयगिरी लॉयन्स नेत्र रुग्णालय उदगीर यांच्या वतीने जनसेवेसाठी मोफत नेत्ररोग निदान व शस्त्रक्रिया शिबीर करण्याचा संकल्प माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केला असून समाजातील गरजूंच्या डोळ्यांंचा दोष तपासणी व त्यावर शस्त्रक्रिया या अभियानाद्वारे करण्यात येणार आहे.
हे ‘दृष्टी अभियान ‘अक्का फौउंडेशनच्या माध्यमातून व उदयगिरी लॉयन्स नेत्र रुग्णालय उदगीर यांच्या वतीने शिरूर अनंतपाळ शहरासह तालुक्यातील येरोळ, साकोळ, उजेड, हप्पिळगाव, तळेगाव दे., राणी अंकुलगा, हालकी यांसह अनेक गावात घेण्यात येणार असून यांसाठी तालुकाध्यक्ष मंगेश पाटील, शहराध्यक्ष अॅड. गणेश सलगरे,गणेश धुमाळे,संतोष डोंगरे, राजू जाधव, पंडीत शिंदे, रमाकांत मुरुडकर, प्रकाश कोरे यांच्याशी संपर्क साधावा,असे आवाहन भाजपा प्रदेश सचिव अरंिवद पाटील निलंगेकर यांनी केले आहे.