26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeलातूरलातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ३३ उमेदवारांचे ३५ अर्ज वैध

लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ३३ उमेदवारांचे ३५ अर्ज वैध

एकमत ऑनलाईन

लातूर : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार दि. २० ऑक्टोबर रोजी दाखल उमेदवारी अर्जाची छाननी झाली. परंतू, सत्ताधारी पॅनलच्या विरोधात विरोधकांनी जवळपास सर्वच उमेदवारांवर आक्षेप दाखल केल्याने आक्षेपांवरील सुनावणी प्रक्रिया लांबली. त्यामुळे निवडणुक निर्णय अधिकारी विजयकुमार ढगे यांनी दि. २१ ऑक्टोबर रोजी रात्री छाननी प्रक्रिया पुर्ण केली असुन या निवडणुकीत ३३ उमेदवारांचे ३५ अर्ज वैध ठरले आहेत. दि. ८ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार असून त्यानंतरच या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.

१९ जागा निवडून द्यावयाच्या जिल्हा बँकेच्या निवडणुक कार्यक्रमानूसार दि. ११ ते १८ ऑक्टोबर दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करुन घेण्यात आले. दि. २० ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया सुरु झाली आणि आक्षेपांची संख्या जास्त असल्याने छाननी प्रक्रिया लांबली व दि. २१ ऑक्टोबर रोजी निवडणुकीत वैध ठरलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. या निवडणुकीसाठी एकुण ११७ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. छाननीत ८२ अर्ज अवैध ठरले तर ३३ उमेदवारांचे ३५ अर्ज वैध ठरले आहेत. मतदारसंघ व उमेवारी अर्ज वैध ठरलेल्या उमेदवरांची नावे पुढील प्रमाणे आहेत.

प्राथमिक कृषी पतपुरवठा व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था तसेच धान्य अधिकोष संस्थांचे प्रतिनिधी लातूर तालुका- पाटील राजकुमार आबासाहेब मळवटी ता. लातूर, जाधव युवराज मोहनराव शिवणी खु. ता. लातूर, औसा तालुका- काकडे श्रीपतराव निवृत्तीराव जवळगा पो. ता. औसा, उटगे श्रीशैल मल्लिकार्जून महाराज गल्ली औसा, निलंगा तालुका- पाटील अशोकराव शिवाजीराव जाऊ ता. निलंगा, सूर्यवंशी राजेंद्र नारायण हंगरगा ता. निलंगा. उदगीर तालुका- भोसले लक्ष्मीबाई चंद्रशेखर नई आबादीनगर उदगीर, जाधव अभंग तानाजीराव विकासनगर उदगीर, देवणी तालुका- बिराजदार गोविंद अर्जूनराव भोपणी ता. देवणी, पाटील दिलीप मलशेट्टी नागराळ ता. देवणी. जळकोट तालुका- पांडे मारुती गोविंदराव तिरुका ता. जळकोट. शिरुर अनंतपाळ तालुका- बिराजदार व्यंकटराव धोंडीराम दैठणा ता. शिरुर अनंतपाळ. अहमदपूर तालुका- पाटील बाबासाहेब मोहनराव इंद्रायणी निवास शिरुर ताजबंद, चाकुर तालुका- पाटील नागनाथ रामराव शिवणी मजरा ता. चाकुर, रेणापूर तालुका- जाधव प्रमोदराव चंद्रकांत विशालनगर लातूर, मोरे सर्जेराव जनार्दन पोहरेगाव ता. रेणापूर.

मार्केटिंग सोसायटी, कृषी औद्योगीक सहकारी संघ, प्रक्रिया सहकारी संस्था, सुतगिरणी, साखर कारखाने व बिज प्रक्रिया सहकारी संस्था- देशमुख धीरज विलासराव बाभळगाव ता. लातूर. नागरी सहकारी बँका, नागरी सहकारी पत संस्था, ग्रामीण बिगर शेती पत संस्था, पगारदार नोकरांच्या सहकारी पत संस्था- सोनकांबळे वसंतराव नारायणराव आंबेडकर शाळेसमोर उदगीर, गोविंपुरकर अशोक वसंतराव पूर्णानंद मंगल कार्यालय त्रिमुर्तीनगर लातूर, खिचडे महादेव रामलिंग आलमला ता. औसा.

मजूर सहकारी संस्था, वीटभट्टी सहकारी संस्था, औद्योगिक कामगार सहकारी संस्था, औद्योगीक विणकर सहकारी संस्था, ग्रामीण कारागीर सहकारी संस्था, प्रिंटींग प्रेस सहकारी संस्था- पाटील जगन्नाथ गुरुनाथ लेबर कॉलनी लातूर, पाटील दिलीप मलशेट्टी नागराळ ता. देवणी. मत्स्य सहकारी संस्था, कुक्कुटपालन सहकारी संस्था, मेंढपाळ सहकारी संस्था, हौसिंग को. ऑप. संस्था, ग्राहक सह. संस्था, दुग्ध सहकारी संस्था, औद्योगीक सहकारी इंडस्ट्रियल स्टेट व बँकेशी संलग्न असलेल्या इतर सहकारी संस्था- माने जयेश विश्वंभरराव रामनगर लातूर, जाधव राजकुमार भाऊराव नारायणनगर लातूर, सोमवंशी संतोष ज्ञानोबा धानोरा ता. औसा.

अनुसूचीत जाती किंवा जमाती सदस्य- सिरसाठ पृथ्वीराज हरिश्चंद्र बौद्धनगर लातूर, पाखरे साहेबराव यशवंतराव भिसेवाघोरी ता. लातूर. इतर मागासवर्गीय सदस्य- दंडिमे चंद्रशेखर प्रभूराव परिवार सोसायटी लातूर, शेळके अनुप ज्ञानोबा हिप्पळगाव ता. शिरुर अनंतपाळ. विमुक्त जाती, भटक्या जमाती किंवा विशेष मागासवर्गातील सदस्य- राठोड अशोक रामराव गरसुळी ता. रेणापूर, किसवे सपना पांडूरंग केशवनगर लातूर

महिला प्रतिनीधी – पाटील स्वयंप्रभा धनंजय हिप्परसोगा ता. औसा, किसवे सपना पांडूरंग केशवनगर, लातूर, केंद्रे अनिता प्रभाकर माकेगाव ता. रेणापूर.

आमदार धीरज देशमुख, आमदार बाबासाहेब पाटील यांच्यासह चारजण बिनविरोध
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत माार्केटिंग सोसायटी, कृषी औद्योगीक सहकारी संघ, प्रक्रिया सहकारी संस्था, सुतगिरणी, साखर कारखाने व बिज प्रक्रिया सहकारी संस्था मतदार संघातून धीरज विलासरव देशमुख, प्राथमिक कृषी पतपुरवठा व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था तसेच धान्य अधिकोष संस्थांचे प्रतिनिधी मतदार संघातून आमदार बाबासाहेब पाटील, मारुती पांडे, नागनाथ पाटील हे चार उमेदवार बिनविरोध निवडुन आले आहेत. निवडणुक कार्यक्रमानूसार दि. २२ नोव्हेंबर रोजी त्याची अधिकृत घोषणा केली जाईल.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या