27.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeलातूरदररोज ३५० कोरोना चाचण्या करणे आवश्यक

दररोज ३५० कोरोना चाचण्या करणे आवश्यक

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
जिल्ह्यात सद्य:स्थितीत एकही कोरोनाबाधित रुग्ण नाही. तरीही कोरोना चाचण्या घेतल्या जात आहेत. लातूर जिल्ह्याची लोकसंख्या २७ लाखांपर्यंत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या नियमाप्रमाणे दर १० लाख लोकसंख्येला १४० कोरोनाच्या १४० चाचण्या करणे बंधनकारक आहे. या नियमाप्रमाणे लातूर जिल्ह्यात दररोज ३५० चाचण्या होणे आवश्यक असल्यामुळे तसा प्रयत्न जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाच्या वतीने केला जात आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा राज्यात शिरकाव झाल्याने सतर्क राहा, चाचण्या वाढवा, लसीकरणाचा वेग वाढवा, अशा सूचनाही जिल्हा प्रशासनास आल्या आहेत.

लातूर जिल्ह्यात मार्च २०२२ मध्ये १४० जणांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर मात्र, एप्रिल व मे महिन्यात आतापर्यंत जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेला नाही. गेल्या दोन महिन्यांत दररोज सरासरी १३० ते १४० चाचण्या केल्यानंतरही जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या निरंक आहे. सद्य:स्थितीत रुग्णालय अथवा गृहविलगीकरणात एकही रुग्ण नाही. त्याामुळे आरोग्य विभाग गत महिन्याभरापासून कोरोनाच्या संसर्गापासून मुक्त आहे. असे असले तरी जागतिक आरोग्य संघटनेच्या नियमानूसार आरटीपीसीआर व अ‍ॅटिजन चाचण्यांची संख्या पुर्ण होत नाही. दर १० लाख लोकसंख्येला दररोज १४० चाचण्या होणे आवश्यक आहे.

या नियमाप्रमाणे लातूर जिल्ह्याच्या २७ लाख लोकसंख्येनूसार दररोज ३५० चाचण्या होणे अपेक्षीत आहे. परंतू, सध्या कोरोनाची लक्षणेच नसल्याने नागरिक चाचण्यांसाठी पुढे येत नाही. परिणामी दररोज सरासरी १३० ते १४० एवढ्याच चाचण्या होत आहेत. दररोज ३५० चाचण्या झाल्यातर कळत न कळत संसर्ग झाला असेल तर तात्काळ उपाययोजना करता येतात. संसर्गाचा उद्रेक वेळीच रोखता येतो. त्यामुळे २७ लाख लोकसंख्येच्या लातूर जिल्ह्यात दररोज ३४० चाचण्या होणे अपेक्षीत आहे. त्यादृष्टीने जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे.

लातूर जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. जिल्ह्यात ८८ टक्क्यांच्या वर कोरोना प्रतिबंधक लस नागरिकांनी घेतल्या आहेत. ९८ टक्क्यांच्या जवळपास पहिला डोस घेण्या-याचे प्रमाण आहे. बुस्टर डोस घेणा-यांची संख्या वाढलेली आहे. पहिला आणि दुसरा डोस घेऊन ज्यांचा निर्धारित कालावधी संपला आहे, त्यांनी बूस्टर डोस घेणे अपेक्षीत आहेत. ज्यांनी आतापर्यंत पहिला, दुसरा आणि बुस्टर डोस घेतला नाही त्यांनी आपले लसीकरण पुर्ण करुन घ्याव, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने वारंवार करण्यात येत आहेत. लसीकरणाला गती देऊन लसीकरण शंभर टक्के झाले तरच लातूर जिल्हा कोरोनामुक्त राहील, असेही सांगण्यात येत आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या