24 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeलातूरअद्यापही ३७ प्रकल्प कोरडेच

अद्यापही ३७ प्रकल्प कोरडेच

एकमत ऑनलाईन

लातूर : लातूर जिल्ह्यातील २ मोठे, ८ मध्यम, १२८ लघू व ४ समन्वय प्रकल्प असे एकुण १४२ प्रकल्प आहेत़ त्यापैकी ३८ प्रकल्प अद्यापही कोरेडे असून ४४ प्रकल्प जोत्याखाली आहेत़ सध्या पावसाळा सुरु आहे़ जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या जवळपास ४९ टक्के पाऊस पडला आहे़ असे असले तरी जिल्ह्यातील प्रकल्पांतील जलसाठा वाढण्यासाठी मोठ्या आणि सलग पावसाची गरज आहे.

लातूर शहराला पाणीपुरवठा होणा-या केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा या मोठ्या प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा दि़ २७ सप्टेंबर २०१८ रोजी संपलेला आहे़ तेव्हापासून या प्रकल्पात जीवंत पाणीसाठा झालेलाच नाही़ आजही हे प्रकल्प जोत्याखालीच आहे़ लोहारा तालुक्यातील निम्न तेरणा प्रकल्पात २५ टक्के पाणीसाठा आहे़ ८ मध्यम प्रकल्पांपैकी ३ प्रकल्पांत २५ टक्के पाणीसाठा आहे़ ३ प्रकल्प जोत्याखाली आहेत तर २ प्रकल्प कोरडे आहेत़ १२८ लघू ४ प्रकल्पांत ५१ ते ७५ टक्के, २३ प्रकल्पांत २५ ते ५० टक्के, २७ प्रकल्पांत २५ टक्क्याच्या खाली पाणीसाठा आहे़ ४० प्रकल्प जोत्याखाली तर ३४ प्रकल्प कोरडे आहेत़ समन्वय ४ प्रकल्पांपैकी एका प्रकल्पात ५१ ते ७५ टक्के, २ प्रकल्पांत २५ टक्क्यांच्या खाली पाणीसाठा असून एक प्रकल्प कोरडा आहे.

जिल्ह्यातील आठ मध्यम प्रकल्पांपैकी लातूर तालुक्यातील तावरजा, निलंगा तालुक्यातील मसलगा हे दोन प्रकल्प कोरेडे आहेत तर रेणापूर तालुक्यातील व्हटी, शिरुर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ व घरणी हे चार प्रकल्प जोत्याखाली आहेत तर रेणापूर तालुक्यातील रेणापूर प्रकल्पात २़६३८ दलघमी, उदगीर तालुक्यातील तिरु प्रकल्पात २़०२० दलघमी व याच तालुक्यातील देवर्जन प्रकल्पात ०़५५५ दलघमी इतका पाणीसाठा आहे़ लातूर तालुक्यातील गोंदेगाव, वासनगाव, चिकुर्डा, निवळी व कातपूर या पाच लघू पाटबंधारे प्रकल्पांपैकी गोंदेगाव, वासनगाव, चिकुर्डा कोरडे आहेत तर निवळी व कातपूर या प्रकल्पातील पाणीपातळी जोत्याखाली आहे.

औसा तालुक्यातील चिंचोली जो़, चिंचोली त़, कारला, तुंगी, नणंद, बेलकुंड, सारोळा, माळकोंडजी, येल्लोरी, खुंटेगाव हे ९ प्रकल्प जोत्याखाली आहेत तर अपचुंदा, सोमदुर्ग, वानवडा, शिवली हे प्रकल्प कोरेडे आहेत़ उदगीर तालुक्यातील पिंपरी प्रकल्पात ०़८३९ दलघमी, कल्लूर-०़२२०, केसकरवाडी-०़२४४, गुरधाळ-०़५६६, निडेबन-०़२३५, डाऊळ-हिप्परगा-१़५३७, गुडसूर-०़५१५, कोदळी-०़३४८ तर चांदेगाव प्रकल्पात २़५९३ दलघमी इतका पाणीसाठा आहे़ निलंगा तालुक्यातील शेडोळ, माळेगाव, केदारपूर, निलंगा, चिलवंतवाडी, हागंरगा, बडूर, हणमंतवाडी, पानचिंचोली हे ९ प्रकल्प कोरडे तर कासार बालकुंदा व हाडगा हे दोन प्रकल्प जोत्याखाली आहेत.

अहमदपूर तालुक्यातील सोनखेड प्रकल्पात ०़६८० दलघमी, थोडगा-०़७३४, वाकी-जोखा, मोघा-१़७५२, तेलगाव-जोखा, कोप्रा किनगाव-३़०२८, कौडगाव-०़२६८, येस्तार-०़१०७, यलदरी- ०़२६०, ढाळेगाव-जोखा, तांबट सांगवी-०़३१५, हगदळ-गुगदळ-०़१८६, अहमदपूर-कोरडे, पाटोदा-जोखा, खंडाळी-जोखा, अंधोरी-०़३४३, काळेगाव-०़८२७, उगिलेवाडी-जोखा, सावरगाव-०़९४७, हंगेवाडी-०़२५२, मावलगाव-०़०५३, मोळवण-०़३४९ तर खरबवाडी प्रकल्प जोत्याखाली आहे़ रेणापूर तालुक्यातील गरसोळी, मोरवड हे दोन प्रकल्प कोरडे, खलंग्री जोत्याखाली, सुकणी-०़१५५ दलघमी, कारेपूर-०़१७५ तर कोष्टगाव प्रकल्पात ०़०४५ दलघमी पाणीसाठा आहे़ चाकुर तालुक्यातील गांजूर, देवंगरवाडी, महाळंगी, हाळी हे चार प्रकल्प कोरडे, जढाळा, आनंदवाडी, बेलगाव, दापक्याळ, अंबुलगा, शिवणी मांजरथ, फत्तूनाईक तांडा, उजळंब, शिवणखेड, मांडूरकी, झरी हे प्रकल्प जोत्याखाली तर बोथी प्रकल्पात ०़३५४, राचन्नावाडी-०़५३४, संगमवाडी २़४७० तर बामाजीचीवाडी प्रकल्पात ०़०१२ दलघमी पाणीसाठा आहे़ देवणी तालुक्यातील दरेवाडी-कवठाळा, अनंतवाडी व कवठाळा ज़ हे तीन प्रकल्प कोरडे आहेत.

दवन हिप्परगा, आनंदवाडी हे प्रकल्प जोत्याखाली तर बोरुळ-०़३३७, वडमुरंबी-०़७८८, गुरनाळ-०़८५० तर लासोना प्रकल्पात ०़२७९ दलघमी पाणीसाठा आहे़ जळकोट तालुक्यातील जंगमवाडी प्रकल्पात ०़११२ दलघमी, हळदवाढोणा-०़८९३, ढोरसांगवी-०.८८०, हावरगाव-०.६५२, चेरा-०.०३६, धोंडवाडी ०.२७६, सोनाळा-०.३८५, डोंगरगाव-१़३३०, गुत्ती क्ऱ १-०.९३५ तर गुत्ती क्ऱ २ मध्ये ०.२९२ दलघमी पाणीसाठा आहे़ शिरुर अनंतपाळ तालुक्यातील पांढरवाडी प्रकल्प जोत्याखाली आहे.

Read More  १७ लाख सदस्यांना मोफत धान्य

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या