24.7 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeलातूर३८ सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांना श्रेणी पोलीस उपनिरीक्षक पदी बढती

३८ सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांना श्रेणी पोलीस उपनिरीक्षक पदी बढती

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हा पोलीस दलात ३० वर्षे सेवा पूर्ण झालेले व सहाय्यक उपनिरीक्षक पदावर ३ वर्ष सेवा पूर्ण झालेल्या अधिका-यांना श्रेणी उपनिरीक्षक पदी बढती मिळाली असून त्याची सुरुवात पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी केली आहे.
३ वर्षापूर्वी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी बढती मिळालेल्या अधिका-यांना श्रेणी पोलीस उपनिरीक्षक म्हणून संबोधण्यात यावे. अशी तरतूद २५ फेब्रुवारी २०२२ च्या शासन निर्णयात करण्यात आली होती. त्यानुसार लातूर जिल्हा पोलिस दलातील पात्र ठरलेल्या ३८ सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकांना श्रेणी उपनिरीक्षक पदी पदोन्नती दिली. तसे आदेश दि. १५ जून रोजी पोलिस अधीक्षकांनी काढले आहेत.

तसेच ४ पोलीस हवालदार यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी तर ६ पोलीस नाईक यांना पोलीस हवालदार पदी पदोन्नती देण्यात आली. या पदोन्नतीच्या निर्णयामुळे पोलीस दलातील पोलीस हवालदार व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तसेच श्रेणी पोलीस निरीक्षकांच्या संवर्गातील पदाच्या वाढीमुळे एकूणच तपासी अधिका-यांच्या संख्येत वाढ होणार असल्याने एकूण तपासी अधिका-यांच्या संख्येत वाढ होणार असल्याने गुन्ह्यांची उकल होण्यास तसेच सामान्य नागरिकांना मदत घेण्यास अधिक सुलभता येईल आणि गुन्हे उघडकीस येण्याच्या व रोखण्याच्या प्रमाणामध्ये देखील भरीव वाढ होणार आहे. शिवाय पोलीस अधिका-यावर तपासाचे कामाचे ताण काही अंशी कमी होण्यास मदत होणार आहे.

पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून भरती झालेल्या पोलीस अंमलदारांना पोलीस अधिकारी म्हणून सेवानिवृत्त होणार असल्याने लातूर जिल्हा पोलिस दलात आनंदाचे वातावरण असून श्रेणी पोलीस उपनिरीक्षक तसेच सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक व पोलीस हवालदार पदी पदोन्नती मिळालेल्या पोलीस अंमलदारांना पोलीस अधीक्षक निखिल ंिपगळे यांनी कौतुक केले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या