लातूर : गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात नव्या रुग्णांच्या संख्येत चढउतार सुरू असून, आज ३९ नव्या रुग्णांची भर पडली आहे़ सोमवार दि़ ३० नोव्हेंबर रोजी एकूण ३९ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आल्यानंतर आता जिल्ह्यात एकूण ३८१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत़ दरम्यान आज एकाही रुग्णाचा बळी गेला नसल्याने बळींची संख्या ६४५ वर स्थिरावली आहे.
रविवारच्या तुलनेत ही संख्या कमी झाली असून, सोमवारी ४२ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या ३८१ वर गेली आहे़ आज रिकव्हरी रेटमध्ये किंचितशी वाढ झाली असून, ९५.२९ असा नोंदला गेला. जिल्ह्यात आज १८१ आरटीपीसीआर, तर २१३ रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आल्या. यात आरटीपीसीआरमधील २०, तर रॅपिड अँटिजनमधील १९ असे एकूण ३९ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या २१ हजार ८२८ झाली असून, यापैकी २० हजार ८०२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
दूध डेअरीच्या तेरा एकर जमिनीवर अनेकांचा डोळा