22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeलातूर३९४३ शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या

३९४३ शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बहुचर्चित आंतरजिल्हा बदल्याची प्रक्रिया पुर्ण झाली. राज्यातून ३ हजार ९४३ शिक्षकांना हव्या असलेल्या जिल्ह्यात आंतरजिल्हा बदल्या मिळाल्या आहेत. हजारो गेल्या दिड ते दोन वर्षापासुन आंतर जिल्हा बदलीचा पाच टप्पा मार्गी लावण्यासाठी खुला प्रवर्ग कर्मचारी महासंघ, शिक्षक सहकार संघटना बरोबरच इतर संघटनाही अग्रही होत्या. शिक्षकांना मायभुमित जाण्याची संधी या बदली प्रक्रीयेमुळे मिळणार आहे.

दोन वर्षा पासून बहुप्रतीक्षित आंतरजिल्हा बदलीची ऑनलाईन प्रक्रिया पुर्ण होत आसुन सोमवारी ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते आंतर जिल्हा बदलीच्या याद्या प्रकाशीत होणार आहेत. ३ हजार ९४३ शिक्षकांच्या पाचव्या टप्प्यात आंतर जिल्हा बदल्या झाल्या आसुन यात काम चालू असल्याने संख्या वाढण्याची शक्यता आहे. तसेच आंतर जिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त कधी करावयाचे या बाबत ही मंत्री निर्णय घेणार आहेत.

दहा टक्के पेक्षा अधिक रिक्त पदे असलेल्या जिल्ह्यांना बदली प्रक्रियेतून वारंवार वगळले जात होते. या अटीचा सर्वाधिक फटका कोकण विभागातील जिल्ह्यांना बसत होता. परंतु यावेळी खुला प्रवर्ग कर्मचारी महासंघाच्या मोठ्या पाठपुराव्यामुळे या जिल्ह्याचा समावेश बदली प्रक्रियेत झाला आहे. आपल्या कुटुंबापासून वर्षानुवर्ष दुर राहुन विद्यादानाचे व्रत पाळणारे शिक्षक स्वत:च्या जिल्ह्यात गेले. यासाठी शिक्षक सहकार संघटनेचे राज्याध्यक्ष संतोष पिट्टलवाड, शुभांगी चौधरी, निलेश देशमुख, दिप परचंडे, गजानन देवकत्ते, नागपुर, रवि अंबुले, अविनाश जुमडे, राहुल मसुरे, मनोज बनकर, मनोज कोरडे, कैलास चौहान, बसुळे आदिंनी प्रयत्न केले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या