30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeलातूरलातूर-औसा महामार्गावर ४ लाखांच्या औषधांची लूट

लातूर-औसा महामार्गावर ४ लाखांच्या औषधांची लूट

एकमत ऑनलाईन

औसा : औसा शहरापासून जवळच असलेल्या चंद्रलोक हॉटेलच्या समोरील बाजूस तिघा जणांनी एक दुचाकी अडवून त्या व्यक्तीकडील २ हजार रुपये व ४ लाखांचा औषधाचा बॉक्स लंपास केला. लातूरकडे जाणा-या शेतक-याची कार अडवून त्या कारचे अपहरण केल्याची घटना शुक्रवार दि. २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी घटली आहे.

जयवंत फुलारी हे आपल्या दुचाकीवरून औषधाचा बॉक्स घेवून लातूरहून औशाकडेकडे दि. २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास जात असताना औसा-लातूर रोडवर असलेल्या चंद्रलोक हॉटेलजवळ बाबा ऊर्फ मोहसिन पठाण रा. औसा व इतर दोघा अनोळखी तरुणांनी यास अडविले. त्यांच्याजवळील २ हजार ५५५ रोख व ४ लाख रुपये किंमतीच्या औषधाचा बॉक्स व इतर साहित्य असा एकूण ४ लाख १० हजार ५५५ रुपयांचा ऐवज लुबाडला. ही घटना जिथे घडली तेथून ३०० मीटर अंतरावर मूळचे लिंबाळा ता. औसा येथील पण लातूर येथे राहत असलेले सुनील शिवाजी देशमुख हे आपल्या पांढ-या रंगाच्या एमएच २४ एएफ ०२४ या कार मधून नेहमीप्रमाणे लातूर कडे जात होते. त्या तिघा चोरटयांनी काही अंतरावर या कारच्या आडवी आपली दुचाकी लावली. कारचालक देशमुख यांना कार थांबविण्याचा इशारा केला. ते थांबले नाहीत. पुन्हा काही अंतरावर दुचाकी कारच्या समोर लावली.

त्यावेळी दुचाकीवर असलेल्या दोघांनी कारजवळ येऊन कार थांबविण्यास भाग पाडले. दोघांपैकी एक जण चालकाच्या शेजारी बसला. एक जण पाठीमागे खपटी बॉक्स घेवून बसला. त्याने स्वत: गाडी चालविणा-या सुनील देशमुख यांना चाकूचा धाक दाखवून धमकी दिली. त्यांचा मोबाईल हिसकावून घेतला. दरम्यान, एका चोरटयाने स्वत: गाडी चालवायला सुरुवात केली. सुनील देशमुख यांना चालकाच्या शेजारी सीटवर बसण्यास सांगितले. लातूरच्या दिशेने ही कार सुसाट निघाली. घाबरलेल्या सुनील देशमुख यांना आता आपणास नेमके कोठे नेणार याची भीती वाटली. मोबाइल हिसकावून घेतल्याने त्यांना कोणाशी संपर्क साधता येत नव्हता.

पण खड्डे आणि स्पीड ब्रेकर असल्याने बुधडा गावानजीक गाडीचा वेग अत्यंत कमी होताच प्रसंगावधान राखून सुनील देशमुख यांनी गाडीचा दरवाजा काढून गाडी बाहेर उडी मारली. चोरटे ती गाडी घेऊन तसेच निघून गेले. दरम्यान, सुनील देशमुख यांनी बुधोड येथील गावक-यांशी संपर्क साधला. औशाचे पोलीस उपाधिक्षक नवले, पोलीस निरीक्षक ठाकूर यांनी अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांच्या मार्गदर्शनानुसार तपास चालू केला.याप्रकरणी औसा पोलिसांत भादंवी ३९४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली औसा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल बहुरे हे करीत आहेत. संध्याकाळच्यावेळी अत्यंत गर्दी व रहदारी असलेल्या रोडवर दुचाकीवरील तिघांनी एका दुचाकी चालकास व एका शेतक-यास लुटले. शेतक-याने मात्र प्रसंगावधान राखून स्वत:ची सुटका करून घेतली. औसा रोडवर घडलेल्या या थराराने या रोडवरून प्रवास करणा-या वाहनचालकांत भीती निर्माण झाली आहे. दरम्यान, अपहार करण्यात आलेल्या पांढ-या रंगाची ही कार बीड जिल्ह्यातील बर्दापूर शिवारात आढळून आल्याने सांगण्यात येते.

कोरोनामुळे यंदा शारदीय नवरात्रोत्सवाला ब्रेक

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या