22.1 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeलातूररेणापुरात ४० किलो प्लास्टीकच्या पिशव्या जप्त

रेणापुरात ४० किलो प्लास्टीकच्या पिशव्या जप्त

एकमत ऑनलाईन

रेणापूर : राज्यात सिंगल युज प्लास्टीक (कॅरिबॅग) वर बंदी असताना बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात कॅरिबॅगचा वापर होत आहे. विभागीय आयुक्त कार्यलयाच्या आदेशानुसार येथील नगरपंचायत प्रशासनाच्या पथकाने गेल्या दोन दिवस मोहीम राबवित ३५ ते ४० किलो प्लॉस्टीक पिशव्या (कॅरिबॅग ) जप्त करुन दंडात्मक कार्यवाही केली .

प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन ( सुधारणा ) नियम २०२१ केंद्र शासनाच्या अधिसुचनेनुसार राज्याशासनाने सिंगल युज प्लॅस्टिक बंदी बाबत कठोर नियमावली केली तरी सुध्दा आठवडी बाजार, मंडई, फळ, भाजीपाला विक्रेते, किराणा व अन्य दुकानदार कॅरिबॅगचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात असल्याने नगर परिषद व नगरपंचायत प्रशासनाने हद्दीत मोहीम राबवून प्लॅस्टिक, कॅरीबॅग बंदी वापरणा-या व बाळगणा-यांविरूद्ध कार्यवाही करावी असा आदेश विभागीय आयुक्त कार्यलय, नगर परिषद विभागाचे सह आयुक्त यांनी दिल्यावरून येथील नगरपंचायतचे मुख्याधिकारी मंगेश शिंदे यांच्या मार्गदर्शन खाली कार्यलयीन अधीक्षक अशोक स्वामी , पाणी पुरवठा अभियंता विशाल विभूते, स्वच्छता निरीक्षक सिध्दार्थ आचार्य, लिपिक श्रीकांत धुमाळ, माधव भुतकर, विशाल इगे, गुलाब शेख, मिरा कसबे, नंदुबाई चव्हाण, याच्यासह आदी कर्मचा-यांच्या पथकाने मोहीम राबवित अंदाजे ३० ते ३५ किलो प्लास्टिक पिशव्या (कॅरिबॅग) जप्त केल्या . कडक मोहिम राबविली जात असल्याने व्यापा-याांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या