रेणापूर : प्रतिनिधी
सध्या पावसाचे दिवस असून तालुक्यातील डिघोळ देशमुख गावातील सार्वजनिक ठिकाणच्या खांबावरील लाईट बंद होत्या. गावातील काही जेष्ठ नागरिकांनी व माता भगिनी यांनी याची माहिती गावातील मनसे पदाधिकारी यांना सांगितली. त्यावरून पदाधिका-यांनी मनसे शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष भागवत शिंदे यांना फोन करून गावातील अडचण सांगितली त्यांनी तात्काळ पथदिव्याची व्यवस्था करून भर पावसात ४० पथदिवे बसवले.
सद्या पावसाळयाचे दिवस असून गावातील खांबावरील लाईट बंद असल्याने रस्त्यावर ये-जा करण्यासाठी अडचण येत आहे. तसेच अंधारात लहान मुले आणि वयोवृध्द नागरिकांना खूपच त्रास होत आहे. तुम्ही काहीही करा पण ही गावक-यांची अडचण सोडवा अशी विनंती डिघोळ देशमुख येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मनसे शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष भागवत शिंदे यांना केली. सर्व परिस्थिती चे गांभिर्य लक्षात घेऊन क्षणाचाही विलंब न करता कोणत्या खांबावरील किती लाईट बंद आहेत याची माहिती घेत शिंदे यांनी तात्काळ खांबावरील बंद पडलेले ४० पथ दिवे भर पावसात बसवण्यात आले.
यासाठी संतोष चव्हाण, किरण शिंदे, अंिजक्य कदम, आकाश आगरकर, करण देडे, बाळासाहेब शिंदे,आकाश काळे, बालाजी माचवे, सुरज देडे, लखन हाके, अजय जोगदंड, लक्ष्मण घोडके, ऋषिकेश हाके, सूर्यकांत झाडकर, राहुल घोडके, कृष्णा काळे, अविनाश हाके, करण घोडके, शुभम हाके, गोपाळ हाके, रवी काळे, महादेव दर्शने, खंडू घोडके, संतोष घोडके, बालाजी काळे, महादू साठे, गोविंद देडे, शशिकांत देडे, राम हाके, नारायण घोडके, ऋषिकेश दर्शने, परमेश्वर घोडके, ज्ञानेश्वर घोडके, गोविंद हाके, नवनाथ काळे, करण घोडके, देडे कृष्णा, शाहीर धर्मराज, काळे विकास, जोगदंड योगेश, देडे आकाश, देडे मनोज, महेश चव्हाण, दयानंद मस्के आदींनी परिश्रम घेतले.