Tuesday, September 26, 2023

कुष्ठ, क्षयरोगाचे संशयित ४०५ रुग्ण आढळले

जळकोट (ओमकार सोनटक्के) : तालुक्यातील दोन प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत एक ते १५ डिसेंबर या कालावधीत कुष्ठरोग व क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत सक्रीय कुष्ठरोग व क्षयरोग रुग्ण शोध अभियान राबविले जात आहे. या मध्ये ते जळकोट तालुक्यातील ८०२५५ नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे, आत्तापर्यंत जळकोट तालुक्यातील ५४३५० नागरिकांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. यात जळकोट तालुक्यामध्ये कुष्ठरोगाचे १७२ तर क्षयरोगाचे २३३ असे जळकोट तालुक्यात ४०५ संशयित रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय पवार यांनी दिली.

जळकोट तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असणा-या गावात कुष्ठरोग व क्षयरोग निर्मूलन मोहीम राबविण्यात येत आहे. या सर्वेक्षणासाठी तालुक्यात ८२ टीम तैनात करण्यात आले आहेत. या टीम मधील १७८ एवढे मनुष्यबळ आहे. वांजरवाडा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत ९८ तर अतनूर प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत ६६ मनुष्यबळ तैनात आहे. यासाठी १४ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. वांजरवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कुष्ठरोगाचे ९१ तर हे रोगाचे ६८ संशयित रुग्ण आढळून आले आहेत, तर आतनूर प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत ८१ कुष्ठरुग्ण तसेच १६५ रोग असलेली संशयित रुग्ण आढळून आलेले आहेत. तालुक्यात ४०५ रुग्ण हे या सर्वेक्षणात आतापर्यंत आढळून आलेले आहेत. आणखीन जवळपास तीस हजार नागरिकांचे सर्वेक्षण होणे बाकी आहे. यामुळे संशयित रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. या आजाराबाबत जनजागृती केली जात आहे अशी माहितीही डॉ. संजय पवार यांनी दिली.

कुष्ठरोगाची लक्षणे
अंगावर फिकट लालसर चट्टा उमटणे, चकाकणारी तेलकट त्वचा होणे, हातापायांना बधिरता येणे, शारीरिक विकृती, न खाजणारा चट्टा, एखाद्या भागावर दीर्घकाळ बधिरता, हाताच्याकिंवा पायाच्या बोटामध्ये वाकडेपणा यासारखी लक्षणे दिसून येतात अशी लक्षणे आढळल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे.

क्षयरोगाची लक्षणे
दोन आठवड्यांपेक्षा अधिक कालावधीचा खोकला, ताप येणे विशेषता रात्री, भूक मंदावणे, वजनात लक्षणीय घट, खोकलताना थुंकीद्वारे रक्त पडणे यासारखी लक्षणे आढळून येतात. अशी लक्षणे आढळल्यास तात्काळ सरकारी दवाखान्यांमध्ये जाऊन वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे.

राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३ टक्क्यांवर

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या