24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeलातूर२२ वर्षांत भूकंपाचे ४५ धक्के

२२ वर्षांत भूकंपाचे ४५ धक्के

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यास गेल्या २२ वर्षामध्ये जवळपास ४५ भूकंपाचे धक्के बसले असून त्यात सर्वाधीक तीव्रतेचा भूकंपाचा धक्का किल्लारीचा आहे. जिल्ह्यात मे ते ऑक्टोबर दरम्यान भूकंपाच्या घटना घडत असतात. हा कालावधी पावसाळयाचा असल्यामुळे अती पाऊस झाल्यास अशा घटना तेरणा नदीच्या परिसरात घडत असल्याचे दिल्लीच्या राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंदाचे वैज्ञानीक अजयकुमार वर्मा यांनी पत्रकार परिषदेत सांगीतले.

यावेळी जिल्हाधिकारी बी. पी. पृथ्वीराज, स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेडच्या भूशास्त्र संकूलाचे संचालक अविनाश कदम, राजीवकुमार, अरविंद भोसले, उपजिल्हाधिकारी सुचिता शिंदे, अशोक वाघमारे आदी उपस्थित होते. निलंगा तालुक्यातील हासोरीचा परिसर झोन ३ मध्ये येतो. या परिसराची बारकाईने तपासणी करण्यात आली. राष्ट्रीय भूकंप मापन केंद्राच्या वतीने औसा तालुक्यातील आशिव व निलंगा तालुक्यातील हासोरी येथे भूकंप मापक केंद्र उभारण्यात आले आल्याचे सांगून वैज्ञानीक वर्मा म्हणाले की, ३१ डिसेंबर २०२१ ला ३.१ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. दि. १३ सप्टेंबरला १.३ रिश्टर स्किलचा तर आज पहाटे ३.३८ वाजता २ रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याची नोंद झाली आहे. तेरणा नदी पत्राच्या परिसरात भूकंपाच्या घटना घडतात. पण त्या सर्वसाधारण आहेत.

यावेळी संचालक कदम म्हणाले की, गेल्या २० वर्षात लातूर-नांदेड भोवती अहमदपूर, सोनपेठ, कळंब, औराद बाराळी, बसवकल्याण, आदी ठिकाणी ११ भूकंप मापक यंत्र बसवण्यात आले आहेत. निलंगा तालुक्यातील हासोरी येथील नागरीकांशी गेल्या १५ दिवसापासून संवाद चालू आहे. भूगर्भातील आवाजामुळे कंपन होते. आज पहाटे ३.३७ वाजता २ रिश्टर स्किलचा भूकंप झाल्याचा फोन आला. भूकंप मापन केंद्रावर पाहिले असता ते खरे असल्याचे दिसून आले.

घराचे बांधकाम करण्यासाठी सेल स्थापन करू
लातूर जिल्हयात भूकंपाच्या घडणा-या घटना पहाता जिल्हयात घराचे बांधक भूकंप रोधक होण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बांधकाम कसे करावे या संदर्भाने सेलची स्थापना करू असे सांगून जिल्हाधिकारी पृथ्वीराज म्हणाले की, भूकंप परिसरातील धोकादायक गावांचा सर्व्हे करण्यात येणार आहे. हासोरी गावात गेल्या आठ दिवसापासून सुरक्षेच्या दृष्टीने आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाद्वारे माहिती दिली जात आहे. तसेच असुरक्षीत घरांचा सर्व्हे करण्यात आला आहे. तेरणा नदी पत्राच्या परिसरात काळी माती जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे बांधकामे लवकर कोसळतात. नदीच्या पात्रात सतत हालचाली घडत असल्याचे ते म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या