24.3 C
Latur
Thursday, June 24, 2021
Homeलातूर461 वीज चोरांविरुध्द महावितरणची कारवाई

461 वीज चोरांविरुध्द महावितरणची कारवाई

एकमत ऑनलाईन

लातूर, दि. 24:- महावितरणचे औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. नरेश गित्ते यांच्या सुचनेनुसार व मुख्य अभियंता दिलीप भोळे, अधिक्षक अभियंता (बीड) रविंद्र कोलप यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता संदीप चाटे, उपकार्यकारी अभियंता प्रशांत अंबाडकर व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी सहा गावात छापे टाकून 461 वीज चोरांवर कारवाई करुन आकडे टाकून वापरले जात असलेली शेगडी हिटर आणि वायर जप्त करण्यात आले.

सध्या मराठवाडयात अनधिकृत वीज वापरणाऱ्याविरुध्द कारवाई करण्यात येत आहे. परळी तालूक्यातील करण्यात आलेल्या कारवाईचा तपशील पुढीलप्रमाणे. गाव आणि गावाच्या नावापुढील कंसात दिलेली संख्या वीजचोराविरुध्द करण्यात आलेल्या वीजचोरांची आहे. नागापूर(50), जिरेवाडी(130), रेवली(150), परळी शहर- मलीकपुरा(60), भीमनगर(55) तर केज तालुक्यातील सावळेश्वर(16) याप्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. नागरिकांनी अनधिकृत वीज वापराऐवजी नियमित वीज जोडणीव्दारेच वीज वापर करुन कटु कारवाईपासून आपली सुटका करुन घ्यावी असे आवाहन लातूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप भोळे यांनी केले आहे.

रेणापूर तालुक्यात पहिल्या टप्प्यात २३ कोरोनाबाधित

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
202FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या