34.7 C
Latur
Tuesday, March 9, 2021
Home लातूर ‘जेएसपीएम’च्या वसतिगृहातील ४७ विद्यार्थी पॉझिटीव्ह

‘जेएसपीएम’च्या वसतिगृहातील ४७ विद्यार्थी पॉझिटीव्ह

एकमत ऑनलाईन

लातूर : गेल्या चार-पाच दिवसांत कोरोना विषाणुच्या संसर्ग गतीने वाढत आहे. त्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण असताना लातूरच्या एमआयडीसीत जेएसपीएम संस्थेद्वारा संचलित एकाच वसतिगृहातील ४७ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. दि. २३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.२१ वाजेपर्यंत या वसतिगृहातील ३६० विद्यार्थ्यांपैकी २६० विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली. त्यात ४७ विद्यार्थी कोरोना पॉझिटीव्ह आढळले असून उर्वरीत विद्यार्थ्यांच्या कोरोना चाचणी रात्री उशिरापर्यंत सुुरुच राहणार असल्याची माहिती महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. महेश पाटील यांनी दिली.

येथील एमआयडीसीत जेएसपीएम या संस्थेअंतर्गत स्वामी विवेकानंद इंटीग्रेटेड इंग्लिश स्कुल चालवले जाते. याच संस्थेचे याच परिसरात वसतिगृही आहे. या वसतिगृहात इयत्ता ५ वी ते इयत्ता १० वी पर्यंतचे ३६० विद्यार्थ्यांसह १० शिक्षक, २० स्वयंपाकी आहेत. दि. २२ फेब्रुवारी रोजी या वसतिगृहातील ३९ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बाब समोर आल्याने एकच खळबळ उडाली. त्यामुळे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दि. २३ फेब्रुवारी रोजी या वसतिगृहातील सर्वच विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी सुरु केली. सायंकाळी ५.२१ वाजेपर्यंत ३६० पैकी २६० विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली. त्यात इयत्ता ६ वीमधील १, इयत्ता ९ वीमधील ९ व इयत्ता १० वीमधील ३७ असे एकुण ४७ विद्यार्थ्या पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. उर्वरीत सर्व विद्यार्थी, शिक्षक, स्वयंपाकी, पालकांची चाचणी रात्री उशिरापर्यंत केली जाणार असल्याची माहिती मनपाचे आरोग्याधिकारी डॉ. महेश पाटील यांनी दिली. वसतिगृहातील कोरोनाबाधित ४७ विद्यार्थ्यांना येथील १२ नंबर पाटीवरील वसतिगृहात क्वारंटाईन करण्यात आले तर इतरांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहे.

एक विद्यार्थीनीचा अहवाल पॉझिटीव्ह आला आणि…
महानगरपालिकेच्या वतीने शहरात पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन, पटेल चौकातील पंडित नेहरु मनपा रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र इंडियानगर येथे कोरोना चाचणी केंद्र सुरु आहे.. इंडियानगरमधील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत केलेल्या कोरोना चाचणीत एका विद्यार्थीनीचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे ती विद्यार्थीनी कुठली याचा शोध घेण्यात आला. ती विद्यार्थीनी जेएसपीएम संस्थेद्वारा संचलित वसतिगृहातील असल्याची माहिती मिळाली. त्यानूसार संस्थाचालकांशी संपर्क साधून त्याची माहिती दिली आणि दि. २२ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ ते रात्री ९ वाजेपर्यंत वसतिगृहातील विद्यार्थ्यांची चाचणी केली. त्यात ३९ विद्यार्थ्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. दुस-या दिवशीही विद्यार्थ्यांच्या चाचण्या करण्यात आल्या. सायंकाळी ५.२१ वाजेपर्यंत ४७ विद्यार्थ्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याचे मनपा आरोग्याधिकारी डॉ. महेश पाटील यांनी सांगीतले.

संस्थेचा संपूर्ण परिसर सील
जेएसपीएम संस्थेच्या वसतिगृहातील ४७ विद्यार्थ्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आल्याने या संस्थेचा संर्पूण परिसरत सील करण्यात आला आहे. सदरील ठिकाणी कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आल्याने प्रतिबंधीत क्षेत्र घोषीत केले आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी, असा बोर्ड संस्थेच्या प्रवेशद्वारावर महानगरपालिकेने लावला आहे.

जिल्हाधिकारी मुगळीकर कारवाईसाठी उतरले रस्त्यावर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,446FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या