औसा : प्रतिनिधी
मागच्या ७ वर्षांपासून बंद अवस्थेत असलेल्या बेलकुंड येथील श्री संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याने यावर्षी मांजरा साखर परिवाराचे मार्गदर्शक माजी मंत्री दिलीपराव देशमुख, पालकमंत्री अमित विलासराव देशमुख, आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु केलेल्या यावर्षी प्रथमच गाळप हंगाम सुरु केल्यावर अनेक नैसर्गिक अडचणी निर्माण झाल्या असताना माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या सूचनेनुसार कारखाना प्रशासनाने नियोजन करुन औसा तालुक्यातील ७७ गावांतील २ लाख ८ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून ऊस उत्पादक शेतक-यांना ऊस गाळप पोटी मेट्रिक टन २३०० रुपये एफ आर पी प्रमाणे तब्बल ४८ कोटी ५ लाख ९१ हजार ९०० रुपये त्यांच्या खात्यावर अदा केले असून त्यामुळे तालुक्यातील उस उत्पादक शेतक-यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान यावर्षी प्रथमच गाळप हंगाम यशस्वीपणे पूर्ण झाल्याने शेतक-यांच्या पदरात पैसे पडल्याने उजनी, बेलकुंड, तालुक्यातील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर आवक वाढली आहे
औसा तालुक्यातील बेलकुंड येथील श्री संत शिरोमणी मारुती महाराज साखर कारखाना सलग सात वर्ष बंद होता त्यानंतर निवडणूक झाली त्यात पालकमंत्री अमित देशमुख यांच्या नेतृ्त्वाखाली संपूर्ण पॅनल निवडून आले कारखाना सुरु करण्याचा शब्द दिला होता तो पाळून माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पालकमंत्री अमित देशमुख, जिल्हा बँकेचे चेअरमन आमदार धीरज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली चालु हंगामात औसा तालुक्यातील कार्यक्षेत्रात येणा-या सर्व गावातील उसाचे गाळप साखर कारखान्याने केले आहे त्यामूळे तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकरी सभासद याना आर्थिक सुबत्ता देण्याबरोबरच शेतक-यांना प्रगतीकडे घेवून जाण्यासाठी सहकार्य लाभले आहे तालुक्यातील विविध गावात छोटे उद्योग सुरु झाले आहेत पैसा आल्याने मार्केटमध्ये पैसा आल्याने आवक
जावक सुरु असल्याचे चित्र दिसून येत आह.े
उस उत्पादक शेतक-यांना मोठा दिलासा
यावर्षी प्रथमच गाळप हंगाम सुरु केल्यावर पाऊस व अतिरीक्त उसाची लागवड मोठ्या प्रमाणावर झाल्याने अडचणी निर्माण झाल्या होत्या मात्र त्यावर माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली कारखाना प्रशासनाने नियोजन करुन उस उत्पादकांचे सर्व उसाचे गाळप करुन लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे, अशी माहिती मारुती महाराज साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव बाजुळगे, उपाध्यक्ष शामराव भोसले, व्यवस्थापक दत्ता शिंदे यांनी केले आहे.