30.2 C
Latur
Wednesday, March 3, 2021
Home लातूर लातूर जिल्ह्यात ४८ नवे रुग्ण

लातूर जिल्ह्यात ४८ नवे रुग्ण

एकमत ऑनलाईन

लातूर : जिल्ह्यात नव्या रुग्णांच्या संख्येत रोज नव्याने वाढ होत आहे. त्यामुळे रुग्णसंख्येत दिवसेंदिवस भर पडत आहे. आज जिल्ह्यात आणखी ४८ रुग्ण वाढले आहेत, दरम्यान, दि़ १७ जानेवारी रविवार रोजी १२० रुग्णांचा अहवाल प्रलंबीत होता़ त्यापैकी ३९ नवे रुग्ण आढळले़ असे एकूण ८७ नवे रुग्ण आढळले आहेत़ तर २८ रुग्णांनी आज कोरोनावर मात केली.

मंगळवारी १२८ जणांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली, तर ९१० जणांची रॅपिड अ‍ँटिजन टेस्ट करण्यात आली. त्यात आरटीपीसीआरमधील २३, तर रॅपिड अ‍ँटिजन टेस्टमधील २५ असे एकूण ४८ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या २३ हजार ६९४ झाली असून, त्यापैकी २२ हजार ५७६ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ४३५ झाली आहे, तर एकूण मृतांची संख्या ६८३ कायम आहे.

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी २२३ पदांना मंजूरी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या