30.8 C
Latur
Friday, March 5, 2021
Home लातूर १६१ कंटेन्मेंटझोवर ४८३ कर्मचारी कार्यरत

१६१ कंटेन्मेंटझोवर ४८३ कर्मचारी कार्यरत

एकमत ऑनलाईन

लातूर : लातूर शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे़ त्यामुळे कंटेन्मेंट झोनही वाढा अहेत़ दि़ २४ जुलै रोजी सायंकाळपर्यंत लातूर शहरातील कंटेन्मेंट झोनची संख्या १६१ वर पोहंचली होती़ या कंटेन्मेंट झोनवर आठ-आठ तासांच्या तीन पाळ्यांमध्ये महानगरपालिकेचे कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत़ एका पाळीत १६१ कंटेन्मेंट झोवर एकुण ४८३ कर्मचारी कार्यरत असतात़ त्यात एका पोलिस कर्मचाºयाचाही समावेश असतो.

शहरातील सिद्धार्थ सोसायटी, ड्रायव्हर कॉलनी, नाथनगर, विवेकानंद चौक, मदनीनगर, विशालनगर, गगणविहार, वैभवनगर, मंठळेनगर-२, बस्तापूरेनगर, टिळकनगर, सावेवाडी, खोरीगल्ली-३, महसूल कॉलनी-२, सिग्नल कॅम्प-२, झिंगणप्पागल्ली-३, काळेगल्ली-३, साळेगल्ली-४, माताजीनगर, महेबुब सुभानी, गवळीगल्ली, इस्लामपुरा टॉवर लाईन, कव्हा रोड, डालडा फॅक्ट्री, नरकेगल्ली, केशवनगर-३, टाकेनगर, प्रतिभा शााळ, साईधाम, हाकेनगर, सुतमिल रोड, सराफ लाईन, शासकीय कॉलनी जिल्हा परिषद शाळेच्य मागे, प्रकाशनगर-३, पारिजात, शारदा कॉलनी, बालाजीनगर, गौसपूरा रोड, आदर्श कॉलनी, श्री नगर बार्शी रोड, आयशा कॉलनी, भाग्यनगर-३, विशालनगर-४, हत्तेनगर, मोतीनगर, गवळीनगर-२, श्रीकृष्णनगर, जुनी कापड गल्ली, सुळनगर, विठ्ठल हाऊसिंग सोसायटी, रामगल्ली, गिरवलकरनगर, दीपज्योतीनगर, एलआयसी कॉलनी, पंचवटीनगर, होळकरनगर, जुनी सराफ लाईन, केशवनगर, अक्षरधाम, हत्तेनगर, भारत हाऊसिंग सोसायटी, क्वाईलनगर, नंदनवन कॉलनी, देशपांडे गल्ली, तुळजाभवानीनगर जूना औसा रोड, खोरीगल्ली, वालेनगर, विक्रमनगर, मैत्री पार्क, हणमंतवाडी, रामगल्ली, भोईगल्ली, माधवनगर, विलासनगर, मंठाळेनगर, सदाशिवनगर, नावंदरगल्ली, सेंट्रल हनुमान, संभाजीनगर, महादेवनगर आदी ठिकाणी कंटेन्मेंट झोन आहेत़

आजपर्यंत २६६ कंटेन्मेंट झोन झाले
लातूर शहरात आजपर्यंत २६६ कंटेन्मेंट झोन झाले़ त्यापैकी १०५ कंटेन्मेंट झोन खुले करण्यात आले आहेत. या कंटेन्मेंट झोनच्या व्यवस्थेसाठी एक क्षेत्रीय अधिकारी, एक स्वच्छता निरीक्षक, एक कर्मचारी, एक पोलीस कर्मचारी अशी टिम असलले़ शहरातील एकुण १६१ कंटेन्मेंट झोनमध्ये आजघडीला प्रत्येक पाळीला ४८३ कर्मचारी कार्यरत आहेत. आठ-आठ तासांच्या तीन पाळ्यांमध्ये हे कर्मचारी आपले कर्तव्य बजावत आहेत. त्या त्या क्षेत्रीदय अधिका-यांनी कंटेन्मेंटमधील नागरिकांचा एक वॉटस्अ‍ॅप गु्रप तयार केला आहे. कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांना किराणा, भाजीपाला, दुध, पाणी आदी गोष्टींची आवश्यकता असेल तर नागरिक त्या वॉटस्अ‍ॅपवर मागणी टाकतात, त्या मागणीनूसार आवश्यक साधन, सामुग्री नागरिकांपर्यंत पुरवली जात आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,440FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या