21.1 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeलातूरऔसा नगर परिषद अंतर्गत सुविधांसाठी ५ कोटींचा निधी मंजूर

औसा नगर परिषद अंतर्गत सुविधांसाठी ५ कोटींचा निधी मंजूर

एकमत ऑनलाईन

औसा : आमदार अभिमन्यू पवार यांच्या मागणीवरून औसा नगरपरिषद क्षेत्रातील ५१ वेगवेगळ्या पायाभूत सुविधा विकासासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केला असून या विकास निधीतून औसा शहराच्या विकासात भर पडणार आहे. या नव्या सरकारची औसेकरांना विकास कामाची पहिली भेट आहे. या ५ कोटींच्या मजूर विकास निधीतून प्रभाग ८ मोरे गल्ली येथील पिंपळे निवास ते बालाजी पवार यांच्या घर सिमेंट रस्ता १० ल रुपये, प्रभाग ७ भुसारवेस ते बाबूनाथ जोगी यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता तसेच प्रभाग २ रुपेश कारंजे ते मुक्तेश्वर रोडपर्यंत नाली बांधकाम करणे १५ लाख रुपये, औसा शहरातील नागराज पेट्रोल पंप शेजारील राष्ट्रीय महामार्ग ते अपंिसगेकर यांचे रोहाऊसपर्यंत जाणारा रस्ता १० लक्ष रुपये,

प्रभाग ८ किल्ला टाकी ते भुसार गल्ली पाईपलाईन करणे १० लाख, प्रभाग २ वीरभद्र राचट्टे यांचे घर ते प्रकाश डोंगे यांच्या पर्यत सिमेंट रस्ता १४ लाख रुपये, प्रभाग ६ फहिम शेख यांचे घर ते फ्रेंड्स हॉटेल सिमेंट रस्ता व प्रभाग ९ रामेश्वर दुधनकर यांचे घर ते हनुमान मंदिर डांबरीकरण १५ लाख रुपये, प्रभाग ४ सोनवळकर ते राम मसलगे यांचे घर सिमेंट रस्ता १० लाख रुपये, प्रभाग ३ सचिन मोरे यांचे शिंदे यांचे घर सिमेंट रस्ता व नाली बांधकाम १० लाख, प्रभाग ५ कालन गल्ली मस्जिद ते आझाद चौक सिमेंट रस्ता १० लाख, प्रभाग १० हिमायत पटेल यांचे घर ते मस्जिद सिमेंट रस्ता १० लाख, प्रभाग ४ स्वामी यांचे घर ते महामुणी यांचे घर सिमेंट रस्ता १० लाख, प्रभाग २ विजय राचट्टे यांचे घर ते महाराणा प्रताप नगर नाली बांधकाम व प्रभाग ३ लांडगे यांचे घर ते सडू यांचे घर सिमेंट रस्ता १५ लाख, प्रभाग ४ वीरभद्र कल्याणी ते स्वामी यांचे घर डांबरीकरण १० लाख,

प्रभाग ८ घोगरे ते कोरके यांचे घर बंदीस्त नाली बांधकाम १० लाख, प्रभाग ६ गांधी चौक ते सगरे यांचे घर सिमेंट रस्ता १० लाख, प्रभाग ७ धाराशिवे हॉस्पिटल ते अहिल्याबाई होळकर चौक सिमेंट रस्ता १० लक्ष, प्रभाग ८ राजकुमार पवार ते कोरके यांचे घर सिमेंट रस्ता १० लाख, प्रभाग ९ कैकाडी गल्ली ते मोरे गल्ली डांबरीकरण १० लाख, प्रभाग १ संतोष चिकूडेकर ते नरहरे यांचे घर सिमेंट रस्ता १० लाख, प्रभाग ४ दळवे ते शिवशंकर कल्याणी यांच्या घरापर्यंत डांबरी रस्ता करणे १० लाख, प्रभाग ७ माळी गल्ली चौक ते सचिन माळी यांचे घर सिमेंट रस्ता १० लाख, प्रभाग ८ राम स्वामी यांचे घर ते हिरेमठ लादीकरण रस्ता व सचिन उडगे ते शंकर स्वामी यांचे घर नाली बांधकाम १० लाख, प्रभाग ९ मारूती मंदिर सभागृह ते समशोद्धीन शेख यांचे डांबरीकरण १० लाख,प्रभाग १ तोळमारे ते स्वामी यांचे घर सिमेंट रस्ता व प्रभाग ४ बासले ते चौधरी यांचे घर सिमेंट रस्ता १५ लाख, प्रभाग ८ महांिलग कारंजे ते राजूरे यांचे घर रस्ता व नाली बांधकाम २० लाख, प्रभाग ७ दास साळुंके यांचे घर ते जिजामाता विद्यालय सिमेंट रस्ता १० लाख, प्रभाग ९ नितिन श्ािंदे यांचे घर ते पोलिस स्टेशन सिमेंट रस्ता १० लाख, प्रभाग ८ राजूरे ते शेरु पटेल यांचे घर सिमेंट रस्ता व नाली बांधकाम २० लाख, प्रभाग ३ अपंिसगेकर ते कुरसुळे यांचे घर सिमेंट रस्ता १० लाख, प्रभाग ४ अभिमन्यू भोसले ते माधव राठोड घर सिमेंट रस्ता १० लाख, प्रभाग ७ भागवत कांबळे यांचे घर ते धनगर गल्ली समाज मंदिर सिमेंट रस्ता १० लाख, प्रभाग १ लोकरे ते सुभाष राजुरे यांचे घर सिमेंट रस्ता १० लाख,

प्रभाग ८ सतिश नाईक ते अ‍ॅड पटेल यांचे घर सिमेंट रस्ता व नाली १० लाख, प्रभाग ७ अहल्यादेवी होळकर चौक ते किसन कांबळे यांचे घर सिमेंट रस्ता १० लाख, प्रभाग ४ माशाळकर ते गोरख पाटील यांचे घर सिमेंट रस्ता १० लाख रपये यासह वैकुंठ हनुमान मंदिर संरक्षण भिंत १० लाख, मराठा ते मारवाडी स्मशानभूमी सिमेंट रस्ता १० लाख, प्रभाग १० महादेव कांबळे यांचे घर ते वीर हनुमान ते मराठा स्मशानभूमी सिमेंट रस्ता १० लाख, प्रभाग ४ सज्जनगड कॉलनी – दत्ता चांदूर ते नागरसोगेकर यांचे घर रस्ता १० लाख, प्रभाग ८ मुसदिक यांचे घर – औसेकर – हनुमान मंदिर नाली बांधकाम १० लाख, प्रभाग २ सुदर्शन यांचे घर ते मुक्तेश्वर रोड नाली बांधकाम १० लाख, प्रभाग ७ माणिक फुटाणे ते राजेंद्र वडगावे यांचे सिमेंट रस्ता १० लाख, प्रभाग ७ स्वामी रामानंद तीर्थ स्मारक संरक्षण भिंत व शुशोभीकरण १० लाख, प्रभाग ८ बजाज ते दुरुगकर यांचे घर रस्ता १० लाख, प्रभाग २ नरहरे ते महेश वागदरे यांचे घर बंदिस्त नाली बांधकाम १० लाख, प्रभाग १० वीर हनुमान मंदिर रोड ते मराठा स्मशानभूमी नाली बांधकाम १६ लाख आदी कामांचा समावेश आहे. आमदार अभिमन्यू पवार हे अनेक विषयांच्या विकासकामांचा पाठपुरावा करीत असून नजीकच्या कोट्यवधी रुपयांची विकासकामे मंजूर होतील.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या