19.1 C
Latur
Saturday, January 16, 2021
Home लातूर कोराळवाडीत ५ लाखांचे दारुचे रसायन जप्त

कोराळवाडीत ५ लाखांचे दारुचे रसायन जप्त

एकमत ऑनलाईन

निलंगा : लॉकडाऊनच्या काळात दारु विक्रीला बंदी असताना निलंगा तालुक्यातील कोराळवाडी येथे हातभट्टी दारू बनविण्यात येत असलेल्या माहितीवरुन लातूर स्थानिक गुन्हे शाखेने टाकलेल्या धाडीत ५ लाख ५०० हजार रुपये किमतीचे १३ हजार ५०० लिटर दारुचे रसायन नष्ट करण्यात आले असून दहा जणांच्या विरोधात कासारशिरसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निलंगा तालुक्यातील कोराळवाडी येथे हातभट्टी दारू बनवण्यिात असल्याची खात्रीशीर माहिती स्थानिक गुन्हे शाखेला कळताच दि २६ जुलै रोजी सायंकाळी कासारशिरसी पोलिसाना सोबत घेऊन घटनास्थळी धाड टाकण्यात आली. असता त्या ठिकाणी दहा व्यक्ती हातभट्टी दारू बनवित असताना साहित्यासह आढळून आले. पंचासमक्ष पंचनामा करून ५ लाख ५० हजार रुपये किमतीचे हातभट्टी दारू बनविण्याचे १३ हजार ५०० लिटर रसायन नष्ट करण्यात आले.

याबाबत कासारशिरसी पोलिस ठाण्यात आरोपी हरी लक्ष्मण रेवणे, पंडित रामा रेवणे, हणुमंत तिपन्ना उमापुरे, दिलीप दत्तू उमापुरे, संजय गोविंद पाटील, युवराज श्रीपती रेवणे, लक्ष्मण इंद्रजीत पंदले, बालाजी जगन्नाथ पाटील, वठ्ठिल सायबा दगदाडे, लिंबाजी रामचंद्र व्हनाळे यांच्या विरोधात विविध दहा कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

ही कारवाई पोलिस अधिकारी राजेंद्र माने, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव, पोलिस निरीक्षक सुनिल नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक एस़ एच़ रेजितवाड, टी. आर. भालेराव, पोलिस हेड कॉन्स्टेबल अंगद कोतवाल, रामदास नाडे, राजेंद्र टेकाळे, पोना सदानंद योगी, सिध्देश्वर जाधव, युसुफ शेख, सुधीर कोळसुरे, रामहरी भोसले, प्रकाश भोसले, भागवत कटारे, विनोद चिलमे, नामदेव पाटील, बन्टी गायकवाड, पोकॉ रामभाऊ मस्के, सचिन मुंडे, प्रदीप चोपणे, कासारशिरसी पोलिस ठाण्याचे प्रताप गर्जे, मन्मथ धुमाळ, रवी कांबळे यांनी केली.

Read More  काटी येथे अर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,408FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या