24 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeलातूरविद्यमान गळीत हंगामात ५ लाख मे. टन ऊसाचे विक्रमी गाळप

विद्यमान गळीत हंगामात ५ लाख मे. टन ऊसाचे विक्रमी गाळप

एकमत ऑनलाईन

लातूर : विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना परीवारातील आठही संस्था विद्यमान गळीत हंगामात विक्रमी गाळप करीत आहेत. उदगीर तालुक्यातील तोंडार येथील विलास सहकारी साखर कारखाना युनीट-२ मध्ये विद्यमान गळीत हंगाम सन २१-२२ मध्ये आजअखेर ५ लाख मे. टन ऊसाचे विक्रमी गाळप झाले आहे.

विलास सहकारी साखर कारखाना युनीट- २ चा गळीत हंगाम सन २०२१-२२ ची सुरुवात गतीने झाली आहे. गळीत हंगामात कार्यक्षेत्रातील ऊसाचे प्राधान्याने गाळप करण्यात येत आहे. कारखाना गळीत हंगामाची यशस्वी वाटचाल माजी मुख्यमंत्री लोकनेते विलासराव देशमुख यांच्या प्रेरणेने, सहकारमहर्षी माजी मंत्री आमदार दिलीपराव देशमुख, राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख व चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाने सुरु आहे.

या हंगामात गाळप झालेल्या सभासद व शेतक-यांच्या ऊसाला विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा परीवाराच्या धोरणा प्रमाणे गाळप झालेल्या ऊसाला पहिला हप्ता २ हजार २०० रुपये अदा करण्यात येत आहे. विलास साखर कारखाना युनीट झ्र २ कडून प्रतिदिन क्षमते पेक्षा अधिक ऊसाचे गाळप केले जात आहे. या हंगामाम कारखान्याने दि. २३ एप्रिल, २२ अखेर १६३ दिवसात जवळपास १२५ टक्के कार्यक्षमतेचा वापर करुन ५,००,००० मेटन ऊसाचे गाळप केले असुन, ६,१६,८००किं्वटल साखरेचे उत्पादन केले आहे.

यावर्षी कारखान्याने ऊसाला प्रति मे.टन २२०० रुपये प्रमाणे पहीली उचल दिली असुन दि. १० एप्रिल २०२२ अखेर ४,६५,८२७ मे. टन ऊसाचे गाळपास अलेल्या ऊसाला १०२ कोटी ४८ लाख रुपये ऊस बील अदा केले असुन, दि.११ एप्रिल ते २० एप्रिल २०२२ पर्यंत गाळपास आलेल्या २९,६०९.७०७ मे.टन ऊसाचे बील प्रती टन रुपये २२०० प्रमाणे ६ कोटी ५१ लाख रुपयाचे बील मंगळवार, दि. २६ एप्रिल रोजी शेतक-यांच्या बॅक खात्यावर जमा होणार असल्याची माहीती कारखान्याचे व्हाईस चेअरमन रविंद्र काळे व कार्यकारी संचालक ए. आर. पवार यांनी दिली आहे. कारखाना कार्यक्षेत्रातील उदगीर, जळकोट, चाकुर, शिरुर ताजबंद व अहमदपुर तालुक्यातील शिल्लक संपुर्ण ऊसाचे गाळप करण्याचे नियोजन केले असुन कोणाचाही ऊस गाळपा वाचुन ऊस शिल्लक राहणार नाही, अशी माहीती दिली देखील दिली आहे.

माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतीक कार्यमंत्री, तथा लातुर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख व चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांनी विद्यमान गळीत हंगामात विक्रमी ५ लाख मे. टन ऊसाचे गाळप केले बददल सभासद, ऊसउत्पादक, खाते प्रमुख, विभाग प्रमुख व कर्मचारी, ऊस तोडणी – वाहतुक ठेकेदार आणि सर्व हितचिंतकाचे अभिनंदन केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या