23.5 C
Latur
Wednesday, March 29, 2023
Homeलातूरलातूर ग्रामीणमधील रस्त्यांसाठी ५०.६५ कोटी मंजूर

लातूर ग्रामीणमधील रस्त्यांसाठी ५०.६५ कोटी मंजूर

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे राज्य सरकारच्या यंदाच्या अर्थसंकल्पात लातूर ग्रामीण मतदारसंघांतील रस्त्यांसाठी ५०.६५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यातून लातूर ग्रामीण मतदारसंघातील सुमारे ४७ किलोमिटर लांबीच्या रस्त्याची कामे पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

लातूर ग्रामीण मतदारसंघात विविध विकासकामे मंजूर करुन आणण्यासाठी लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुख हे सातत्याने प्रयत्नशील असतात. त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना मतदारसंघातील रस्त्यांबाबत वेळोवेळी पत्र पाठवले व त्यासंदर्भात सातत्याने पाठपुरावाही केला. याची दखल घेवून राज्य सरकारने अर्थसंकल्पात लातूर ग्रामीण मतदारसंघांतील लातूर तालुक्यासाठी २७.७ कोटी, रेणापूर तालुक्यातील रस्त्यांसाठी २.८ कोटी तर औसा तालुक्यातील रस्त्यांसाठी २१.५० कोटी इतक्या निधीच्या तरतुदीचा समावेश केला आहे.

लातूर तालुक्यातील हरंगुळ – मांजरा कारखाना – अलमला रस्ता राज्यमार्ग २४२ किमी १७/५०० ते २०/५००, परळी – अंबाजोगाई – देवळा – मुरुड – जागजी रस्ता रामा २११ किमी ८०/१०० ते ८३/१००, लातूर हरंगुळ – मांजरा कारखाना – चिंचोलीराव – आलमला रस्ता राज्यमार्ग २४२ किमी २०/३५० ते २०/९५०, आखरवाई – खंडापुर – खाडगाव – एमएसएच ५४८ बी किमी ० ते ४/००, मुरुड अकोला – भोयरा – सावरगाव रस्ता प्रजिमा १३ किमी १०/०० ते १७/५०० या रस्त्यांच्या कामांबरोबरच सारसा – गादवड – शिराळा – बोरगाव – निवळी रस्ता किमी २१/५०० ते २६/२०० या मार्गावर सिमेंट काँक्रिट रस्ता मंजूर झाला आहे.

रेणापूर तालुक्यातील फाळेगाव – किनगाव – कारेपूर – तळणी – कासारखेडा – कोळपा रस्ता रामा २४८ किमी रस्त्याच्या रुंदीकरणासह सुधारणा करणे किमी २००/२०२ ते २०३/२००, रामा २४८ बी तळणी – धवेली – जानवळ – वडवळ – प्रजिमा १५ किमी ० – १/००० तर औसा तालुक्यातील तेर – कोडं – भेटा – भादा – औसा रस्ता रामा २३९ किमी ३४/६०० व ४०/१५० वरील पुलाच्या पोहोचमार्गाचे बांधकाम, उस्मानाबाद शिवली बोरफळ रस्ता सुधारणा रामा ६८ किमी ३१०/६९६ ते ३११/६९६, ३१२/६९६, ३१८/१९६, ३१९/६९६, तेर कोंड – भेटा – भादा – औसा रस्ता रामा २३९ किमी २९/६०० ते ४०/१५० रस्ता रुंदीकरण व पुलाचे काम, एकुर्गा – भेटा – रस्त्याची सुधारणा प्रजिमा १२ किमी ९/६०० ते ११/६००, औसा ते बोरफळ ग्रामा ४६ या रस्त्यांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. यासाठी पाठपुरावा केल्याबद्दल आमदार श्री. धिरज देशमुख यांचे ग्रामस्थांनी आभार मानले.

लातूर ग्रामीण मतदारसंघाच्या विकासासाठी मी कायमच प्रयत्नशील
लातूर ग्रामीण मतदारसंघाच्या विकासासाठी मी कायमच प्रयत्नशील आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना आम्ही हक्काने अनेक विकासकामे मंजूर करुन आणली, याचे समाधान आहे. सध्याही विविध योजनांचा मी सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा करीत आहे. केवळ त्यामुळेच लातूर ग्रामीणसाठी ही तरतूद करण्यात आली आहे. याबद्दल मी राज्य सरकारचे आभार मानतो.

– धिरज विलासराव देशमुख,
आमदार, लातूर ग्रामीण.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या